[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला रंग फासला मुंबईत संतापाची लाट!आरोपीला काही तासातच अटक


मुंबई/ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मा साहेब मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्क मधील पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.या घटनेनंतर राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंसह शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी पुतळ्याची पाहणी करून संताप व्यक्त केला.तसेच २४ तासात आरोपींना पकडण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपीच्या शोधासाठी तीन पथक तयार करण्यात आली होती .अखेर या प्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकर याला अटक करण्यात आली आहे.
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकून पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ येत परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे शिवाजी पार्क परिसरात आले. त्यांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच अशा कृत्यातून कुणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे. हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात. एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की, ज्याला स्वत:च्या आई-वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने हे केलं असेल. तसं नसेल तर मग बिहारमध्ये ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग असू शकेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत. आम्ही सर्वांना शांत राहण्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला शोधून काढू, असं सांगितलं आहे. बघुया पुढे काय होतं. पण मी पुन्हा सांगतो, दोनच प्रकारच्या वृत्ती यामध्ये असू शकतात. ज्यांना स्वत:च्या आई-वडिलांचं नाव घ्यायला लाज-लज्जा, शरम वाटत असेल, कोणतरी बेवारस, लावारस व्यक्तीने केला असेल. किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाने मोदींच्या मातोश्रींचा अपमान केला, त्या निमित्ताने बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न झाला. तसाच कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न कुणाचा तरी असू शकतो”, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला.१८ वर्षांपूर्वी असा प्रकार घडला होता. त्यावेळी शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या. आजही तीव्र आहेत. पण मी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. या घटनेमागे कोण आहे त्याला शोधायलाचं हवं”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.दरम्यान या घटनेमुळे केवळ शिवसेना आणि मनसेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र आहेत.या घटनेनंतर फॉरेन्सिक पथकाकडून पुतळ्याजवळील काही इव्हिडन्स गोळा करण्यात आले होते पोलिसांनी शोध घेऊन आरोपीला अटक केली.उपेंद्र पावसकर असे आरोपीचे नाव असून तो ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचे समजते.आता या ठिकाणी अधिक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आआहे
शिवाजी पार्क मैदानाच्या प्रवेशद्वारावरच, मीनाताई ठाकरेंचा अर्धपुतळा आहे.मात्र पुतळ्याच्या, तसेच मैदानाच्या प्रवेशद्वाराच्या सुरक्षेच्या उद्देशाने पुतळ्याजवळ बसवण्यात आलेले पाच सीसीटीव्ही कॅमेरे चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळे या कॅमेऱ्यांच्या रेंजमध्ये मीनाताईंचा पुतळा येत नसल्याने पुतळ्याची विटंबना करणारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ शकला नाही.अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.या बाबत आता चौकशी केली जाणार असल्याचे समजते.

error: Content is protected !!