[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
राजकीय

काँग्रेसने आपल्या बेरोजगारीचा विचार करावा – बाबूभाई भवाणजी

मुंबई/ केवळ भारतालाच नव्हे तर मोदींनी जगाला विकासाचा , शांततेचा आणि बंधुत्वाचां मार्ग दाखवला आहे म्हणूनच जगात एक उत्तम मार्गदर्शक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे असे असताना काँग्रेसने मोदींचा वाढ दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करणे आणि मोदींच्या विरोधात भलते सलते बोलणे म्हणजे एक प्रकारे सूर्यावर थूकं व्याचा प्रयत्न आहे.आणि भारतीय जनता काँग्रेस ची ही नौटंकी कदापि सहन करणार नाही असे मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवांणजी यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले .काँग्रेसला जे ७० वर्षात जमले नाही ते मोदींनी ७ वर्षात करून दाखवले.काँग्रेसने स्वतःच्या बेरोजगारीचे प्रदर्षण जरूर करावे कारण मोदींच्या विकास अभियानामुळे काँग्रेस बेरोजगार झालीय म्हणूनच ते मोदींच्या वाढ दिवशी राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करीत आहे . या उलट मोदींचा वाढ दिवस घराघरात साजरा करण्यात आला जणू काही ते आपल्या कुंटुबाचा एक आहेत ही भावना आज प्रत्येक भारतीयांमध्ये आहे.या उलट काँग्रेसचे झपाट्याने काऊटडाऊन सुरू आहे . काँग्रेस मधून नेते कार्यकर्ते बाहेर पडत आहे त्यामुळेच काँग्रेसला घर घर लागलीय आज काँग्रेसची अशी परिस्थिती आहे दोन तीन वर्ष झाली तरी काँग्रेसला अध्यक्ष मिळेनासा झालाय . तेंव्हा मोदींचा वाढ दिवस बेरोजगार दीन म्हणून साजरा करण्यापेक्षा काँग्रेसने आपल्या बेरोजगारीचा विचार करावा असेही बाबूभाई म्हणाले .

error: Content is protected !!