ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

राज ठाकरे कसे अयोध्येत येतात तेच बघायचे आहे- ब्रिज मोहन

दिल्ली – राज ठाकरे यांनी मुंबईत परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती .माणसे कार्यकर्त्यांनी मुंबईत युपी बिहारच्या लोकांना मारहाण केली होती . त्यामुळे त्यांनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही . असे पुन्हा एकदा भाजपा खासदार ब्रिजमोहन यांनी सांगितले त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा वादावादाच्या भोवर्यात सापडला आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना बृजमोहन यांनी सांगितले कि २००७ पासून राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्रातील आणि खास करून मुंबईतील परप्रांतीय नागरिकांना त्रास देत आहे आणि त्याविरुद्ध मी तेंव्हापासून आवाज उठवतोय . माणसे कार्यकर्त्यांच्या मारहाणीत एका गरीब उत्तर भारतीयाचा मृत्यूही झालेला आहे. त्यामुळे आजही युपी बिहारचे लोक राज ठाकरे यांच्यावर नाराज आहेत . आणि त्यांचा राज ठाकरेंना विरोध आहे. दरम्यान हि आपली वैयक्तिक भूमिका असून त्याचा पक्षाच्या भूमिकेशी संबंध नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला जर योगींचा पाठिंबा असेल तर आपली भूमिका काय राहील या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले . मात्र जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोवर आमचा त्यांना विरोधाच राहील असे ब्रिजमोहन यांनी सांगितले . दरम्यान कोणाचा कितीही विरोध होऊदेत राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणारच असा ठाम निर्धार मनसेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केलेला असून ते या दौऱ्याच्या तयारीलाही लागलेत .

error: Content is protected !!