[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंचे एकत्रित आंदोलन


मुंबई/इंडिगो कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या अजाइल विरुद्ध आंदोलन करण्यासाठी बुधवारी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याचे समजते या आंदोलनाबाबत दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. एकीकडे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा सुरु असताना मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचं हे आंदोलन सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. याआधीही दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी भावना व्यक्ती केली होती, त्यानंतर आता कार्यकर्ते एकत्र रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहेत.चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज यांनी मनसे-शिवसेनेच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना राज यांनी, ‘एकत्र येऊन राहणे मला कठीण वाटत नाही. महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी आमचे वाद आणि भांडणे खूपच लहान आहेत’ असे विधान केले होते. तेव्हापासून या युतीची चर्चा सुरु झाली.
यानंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया देताना, मी छोटे छोटे वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे, महाराष्ट्रातील लोकांना जे हवे आहे ते होईल असं उद्धव ठाकरेही म्हणाले होते
समोर आलेल्या माहितीनुसार, मनसे आणि ठाकरे गट इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. उद्या (बुधवार) 11 वाजता प्रादेशिक मुंबईतील कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत तसेच मनसेचे वरळी विभाग अध्यक्ष यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडणार आहे.

error: Content is protected !!