[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

तुम्हाला जनतेने तडीपार केले आहे – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल


ठाणे – विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीचा ठाण्यात आज विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता खोचक शब्दांत निशाणा साधला. “चंद्राबाबू नायडूंनी तुमचा पाठिंबा मागितला का? बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना. सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार, असं म्हणतात. गिरे तो भी टांग उपर है. घरी बसणाऱ्यांना लोक निवडून देणार नाही”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. “तरीही आपण बिलकुल गाफील राहू नका. ४०० पार बाबत लोक रिलॅक्स झाले होते. मोदी सबको भारी पडले आहेत. तडीपार करणार, अशा घोषणा देणाऱ्यांनो, तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने तडीपार केले आहे. तुम्ही आम्हला काय तडीपार करणार?”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
“निरंजन डावखरे सभागृहात १२ वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन आवाज उचलला आहे. रवींद्र चव्हाण सांगत होते, चांगलं बोलले. संजय मोरे यांचे 3 हजार मत बाद झाली होती. निरंजन यांचे साडेचार हजार बाद झाले होते. समोरचा उमेदवार किर आहे किर्रर्रर्रर्रर्र नावच ओळखत नाही. लोक कशाला किर किर बघतील? डावखरे नाव आले तर मैत्रीला जगणारा माणूस. वेगळे सबंध जपणारे. निरंजन पण तसाच आहे. मात्र त्याच्या हातात फोन देऊ नका. नाहीतर ईव्हीएम हॅक होतो. गंमतीने बोलतो”, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

“निरंजनने पोटतिडकीने १२ वर्ष काम केले आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवले आहेत. या सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली. 2005 शिक्षक प्रश्न मार्गी लागणार. हे सरकार घेणारे नाही तर देणारे सरकार आहे. सरकारने महिलांसाठी अनेक प्रश्न सोडवले आहेत. निरंजन यांनी अनेक कामे केली आहेत. कामाचे कौतुम केले पाहिजे. मोदी यांनी तरुणांसाठी काम केले आहे”, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

error: Content is protected !!