ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही तो फक्त एक ट्रेलर होता- राजनाथसिंह
भूज/पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय लष्कराने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही .या ऑपरेशन सिंदूरला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. आताची मुदतवाढ १८ मे पर्यंत आहे. दरम्यान जर सीज फायर सुरू असताना पाकिस्तानने काही आगळी केली तर भारत कठोर कारवाई करील याचा पुनर्विचार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केला. तसेच ऑपरेशन सिंदूर हा एक ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे, अशा शब्दात संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (१६ मे) रोजी गुजरातमधील भूज एअरबेसवर पोहोचले. सैनिकांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. हे फक्त एक ट्रेलर आहे, वेळ आल्यावर आम्ही संपूर्ण चित्र जगाला दाखवू. राजनाथ सिंह म्हणाले की, सध्याच्या युद्धबंदीमध्ये आम्ही पाकिस्तानला त्याच्या वर्तनाच्या आधारावर प्रोबेशनवर ठेवले आहे, जर त्यांच्या वर्तनात काही अडथळा आला तर कठोर कारवाई केली जाईल. राजनाथ सिंह गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर एअरबेसवर पोहोचले होते.गेल्या तीन दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये दोन चकमकींमध्ये सहा दहशतवादी मारले गेले आहेत. शुक्रवारी लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्धची कारवाई सुरू आहे. त्राल आणि शोपियानमध्ये दोन चकमकींमध्ये दहशतवादी मारले गेले. एक कारवाई उंच पर्वतीय भागात झाली, एक कारवाई गावात झाली. सुरक्षा दलांनी दोन्ही ठिकाणी दहशतवाद्यांना ठार मारले.अशी माहिती त्यांनी दिली.
