[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

एसटी बँक संचालक मंडळाच्या बैठकीत सदावर्ते व शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा


मुंबई/ एसटी बँकेच्या संचालक मंडळाची आजची बैठक वादग्रस्त ठरली.भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली
यात शिंदेंच्या सेनेचे ४ ते ५ संचालक जखमी झाल्याचे समजते त्यानंतर दोन्ही गटाणी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी नोंदवल्या आहेत.
एसटी बँकेच्या बैठकीमध्ये सदावर्ते गट आणि शिवसेना शिंदे गटाचे अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. या बैठकीच्या दरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामध्ये चार ते पाच संचालक जखमी झाल्याची माहिती आहे. या दोन्ही गटाचा वाद आता नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला असून एकमेकांविरोधात तक्रारी देण्यात आल्या आहेत.
या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी बँकेची मिटिंग बोलवण्यात आली होती. त्यामध्ये दिवाळी बोनस वाटपाची चर्चा करण्यात आली. याच मुद्द्यावरून सदावर्ते गट आणि अडसूळ गट यांच्यामध्ये मतभेद झाले आणि नंतर त्याचे रुपांतर हाणामारीमध्ये झालं. एसटी बँकेच्या संचालकांच्या बैठकीमध्ये बाहेरुन आलेली माणसे बसवण्यात आल्याचा आरोप अडसूळ गटाकडून करण्यात येत आहे.
बाबतीत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “या बँकेमध्ये सदावर्तेंनी जो भ्रष्टाचार, गैरव्यवहार केला त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही बँक सुरक्षित वाटत नाही. या बँकेत १२५ कर्मचाऱ्यांची भरती ही पैसे घेऊन करण्यात आली आहे. या बँकेच्या १२कोटीच्या सॉफ्टवेअरसाठी सदावर्तेंच्या गटाने ५२ कोटी दिले आहेत. या सगळ्या गोष्टी आता समोर येत असल्याने त्यांचे पित्त खवळले. त्यामुळेच सदावर्तेंनी बाहेरची माणसे बैठकीत आणले आणि त्यांनी हा राडा घातला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. या प्रकरणी आम्ही नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.”
एसटी बँकेच्या मिटिंगमध्ये बाहेरून लोक आणले होते आणि संचालकांच्या सोबत बसले होते असा आरोप अडसूळ गटाने केला आहे. तशा प्रकारची तक्रार देण्यात आली आहे.
या आगोदर एसटी बँकेच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची हाणामारीची घटना घडली नाही. एसटी को-ऑपरेटिव्ह बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते. परंतु गेल्या काही दिवसात या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच या बँकेतून मोठ्या प्रमाणात ठेवीही काढण्यात येत असल्याची माहिती आहे.
हाणामारीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, यात एक संचालक उभा राहून बोलत असल्याचे दिसत आहे. तो म्हणत आहे की, ‘ही संचालक मंडळाची बैठक आहे. याचे कोणीही रेकॉर्डिंग करू नये, याचा आऊटपूट बाहेर जाता कामा नये, असं वर्तन कुणीही करू नये.’ मात्र यानंतर बैठकीत राडा सुरु झाला, संचालक एकमेकांकडे हातवारे करून भांडू लागले. तसेच एकमेकांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकण्यात आल्या. या घटनेत एकनाथ शिंदे-आनंदराव अडसूळ संघटनेचे ४ ते ५ संचालक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळी एसटी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सुरु होती. या बैठकीला सदावर्ते यांच्या पॅनलचे सर्व संचालक आणि शिवसेना अडसूळ पॅनलचे संचालकही उपस्थित होते. सदावर्ते यांच्या संचालकांनी आमच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला. त्यानंतर मारहाण सुरु झाली. यानंतर मोठा राडा झाला. या राड्यानंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात गेले. पोलीसांकडून दोन्ही गटांची परस्पर विरुद्ध तक्रार घेण्यात आली आहे.
घटनेबाबत एका संचालकाने सांगितले की, आज कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी काही विरोधी संचालकांनी आमच्या महिलांचा अपमान केला. महिलांचे कपडे फाडण्यात आले, मंगळसूत्र तोडण्यात आले, जातीवाचक शिवीगाळ केली, त्यामुळे हा वाद निर्माण झाला. वारंवार त्या संचालकांकडून महिलांचा अपमान होत आहे. त्यामुळे राडा झाला. या प्रकरणाची फिर्याद देण्यासाठी आम्ही पोलीस ठाण्यात आलो आहोत.याघटनेबाबत एका संचालकाने सांगितले की, आज कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी काही विरोधी संचालकांनी आमच्या महिलांचा अपमान केला. महिलांचे कपडे फाडण्यात आले, मंगळसूत्र तोडण्यात आले, जातीवाचक शिवीगाळ केली, त्यामुळे हा वाद निर्माण झाला. वारंवार त्या संचालकांकडून महिलांचा अपमान होत आहे. त्यामुळे राडा झाला.

error: Content is protected !!