संविधान जिंदाबाद सभेत काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर ? भाई जगतापं, माजी आमदार आणि मंत्री यांची दांडी
मुंबई/काँग्रेसने आयोजित केलेल्या जनसभेत काँग्रेसमधील मध्ये पुन्हा एकदा गटबाजी चव्हाट्यावर आले अशी चर्चा आहे. मुंबई काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजीमुळे भाई जगताप, माजी आमदार व मंत्री यांच्यासारखे ज्येष्ठ नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
दिनांक 13 जुलै 2025 रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह येथे कार्यकर्ता मेवाळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, आमदार अस्लम शेख, अमिन पटेल, मधू चव्हाण, जिल्हा अध्यक्ष रवी बावकर, मा. नगरसेवक हाजी बब्बू, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, महेंद्र मुणगेकर, कचरू यादव ,निजामुद्दीन राहील, मंदार पवार, तारक शहा ,जावेद राहीन, अवनी सिंग यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते
दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले पवित्र संविधान बदलण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप काँग्रेस खासदार वर्षाताई गायकवाड यांनी केला आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कुठेही नसलेली भाजपा मतांची चोरी करून सत्तेवर आल्याचा आरोप करण्याच्या अखिल व अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष खासदार इमरान प्रतापगडी यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात सर्वच काँग्रेस नेत्यांनी भाजपवर हल्ला केला. इमरान प्रतापगडी यांनी हिंदी मराठीच्या वारंवार बोलताना, देशाच्या प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या लोकांना मुंबईने समावून घेतले.त्याला रोजी रोटी दिली. कधीही त्यांच्याशी भेदभाव केला नाही. त्याचे स्वप्न साकार केले. महाराष्ट्र ही क्रांतीची भूमि आहे. शाहू फुले आंबेडकरांची भूमि आहे. त्यामुळे इथे भाषेवरून प्रांतावरून कोणत्याही प्रकारचा वाद व्हायला नको असेही प्रतापगडी यांनी सांगितले.
