ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आता एन्काऊंटर सुरू

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आता एन्काऊंटर सुरू झाले आहे लष्कराने 14 दहशतवाद्यांची हिट लिस्ट जारी केली असून चार दिवसांपूर्वी सोफियामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर आज गुरुवारी पुलवामांमध्ये आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला त्यामुळे पहलगाम हल्ल्याशी संबंधित अजून आठ दहशतवादी शिल्लक असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.
पहेलगाम हल्ल्यानंतर अवघ्या १५ दिवसातच लष्कराने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले त्यात जयशी मोहम्मद चा मोरक्या मौलाना अधर्मसूल संपूर्ण कुटुंब ठार झाल तसेच लष्करी तोयभाचे अनेक दहशतवादी मारले गेले त्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या अतिरेक्यांचा शोध घेतला जात आहे सोफिया मध्ये लपलेल्या तीन दहशतवाद्यांना घातल्यानंतर आज पहिला आणखी तिघांना जहनुम मध्ये पाठवण्यात आले. आज मारल्या गेलेल्या अतिरेक्यांमधील एक जण पहेलगाम हल्ल्याच्या वेळी प्रत्यक्ष हजर होता
जम्मू काश्मिरच्या पुलवामाच्या त्रालमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील त्रालमध्ये सकाळपासूनच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. यावेळी सुरक्षा दलाकडून जैशच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. यामध्ये असीफ अहमद शेख, आमीर नझीर वाणी, यावर अहमद भट्ट याचा सहभाग आहे. 3 दहशतवाद्यांचा खात्मा करतानाची ड्रोन दृश्य आता समोर आली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या कठोर कारवाई करत असीफ अहमद शेख या दहशतवाद्याचं घर देखील पाडण्यात आलं होतं. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या शोपियान भागात ऑपरेशन किलर हे राबवून लष्कर ए तौयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता आणि आज पुन्हा एकदा भारतीय सुरक्षा दलाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

error: Content is protected !!