[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार-पंतप्रधान नरेंद्र मोदींची भविष्यवाणी



नाशिक/उद्धव ठाकरे यांची नकली शिवसेना आणि शरद पवार यांची नकली राष्ट्रवादी या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी भविष्यवाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे मोदींचा हा दावा उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघांनीही खोडून काढला आहे
आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली नाशिकमधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीतील भाजपा उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीय पवार यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली होती या सभेत मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली ते म्हणाले विरोधी पक्षाच्याच ठिकाणी त्याचे म्हणणे आहे की छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचे त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोन्ही पक्ष आता आकाराने छोटे आहेत त्यामुळे त्यांचे काँग्रेसमध्ये विकणे काय होऊ शकते. शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाले तर बाळासाहेबांच्या आपल्याला खूप दुःख होईल बाळासाहेब म्हणायचे की ज्या दिवशी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझ्या पक्ष बरखास्त केली आज मला त्याच गोष्टीची आठवण येत आहे असेही मोदी यांनी सांगितले

error: Content is protected !!