ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

कोण होणार विधानसभा अध्यक्ष


मुंबई – अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला . तसेच इतरही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक मागील हिवाळी अधिवेशनात ,२८ डिसेंबर रोजी नव्या नियमानुसार आवाजी मतदानाने घेण्यात येणार होती .पण नव्या नियमाबाबत सरकारने आपल्याला कळवले नाही असे सांगून राज्यपालांनी निवडणुकीला विरोध केला होता. त्यावरून त्यावरून राज्यपाल आणि सरकार मध्ये बराच वाद झाला. परिणामी हिवाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शक्ली नाही . त्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी राज्यपालांशी चर्चा केली जाणार आहे, आणि त्यानंतर मुख्यमत्री तारीख ठरवतील . असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच आज इतरही काही निर्णय घेण्यात आले. यात महाराष्ट्रातील विविध अकृषी विद्यापीठांमध्ये अध्यासन केंद्र निर्माण करण्याकरता,निश्चित केलेल्या धोरणास मंजुरी देण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास क्षेत्र येथे शेळीसमूह योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता विभागाचे नामकरण कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग असे करण्याचा निर्णय घेण्यात आला . आणि महाराष्ट्र विधान मंडळाचे सन २०२२ चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन अभिनिमंत्रित करण्याचा निर्णय झाला.

error: Content is protected !!