ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

उद्वव ठाकरे यांचे भाजपला उघड आव्हान हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा!

मुंबई – सत्ता हवी असेल तर खुशाल घ्या पण महाराष्ट्राला बदनाम करु नका.महाराष्ट्रासाठी काही तरी चांगल करून दाखवा आणि नंतर सतेचे डोहाळे जेवण करा आम्ही मर्द आहोत आमच्यावर समोरून वार करा ईडी आणि सीबीआय चां आडून वार करण्याचा प्रयत्न करू नका आणि हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा असे उघड आव्हान आज दसरा मेळाव्यात ठाकरे यांनी भाजपला केले यावेळी त्यांनी केंद्राची सुधा कठोर शब्दात हजेरी घेत केंद्र आणि राज्य सरकारचे नेमके अधिकार काय याबाबत संघ राज्यावर चर्चा व्हायला हवी आणि त्यासाठी सर्व राज्यांनी एकत्र यायला हवे असा एक महत्वाचा मुद्दा मांडला तर राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व असे म्हणत भाजपच्या हिंदुत्वाचे वाभाडे काढले .
आज शनमुखानंद हॉल मध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला यावेळी यावेळी ठाकरे यांनी सुरुवाती पासून शेवट पर्यंत भाजपची आणि केंद्र सरकारची खरडपट्टी काढली.आमचा आवाज दांबनारा जन्माला यायचं आहे अशी सुरुवात करून माझ्या आई वडिलांनी मला चांगले संस्कार दिलेत त्यात सता काय येईल जाईल पण अहणपणा दाखवू नको . अहांपणा दाखवला की संपला त्यामुळे माझ्या वागण्या बोलण्यात कधीच अहणपना नसतो.माझ्या या भाषणानंतर काही लोक चिरक्तील पण मी त्यांच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी बोलतोय त्यांनी किती जरी माझ्या विरुद्ध डोकं आपटल तरी माझा वाडा चिरेबंदी आहे मला फरक पडणार नाही.भाजपला उद्देशून ते पुढे म्हणाले की तुम्ही जर वाचन पाळले असते तर आज ना उद्या तुमचा मुख्यमंत्री झाला असता पण मी मात्र माझ्या वडिलांचे वचन पाळले आणि यापुढेही शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवीन हिंदुत्व बद्दल बोलताना राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व आहे आणि देश हाच आमचा धर्म असा विचार घेऊन आम्ही बाहेर पडतो.धर्माचं अभिमान असायलाच हवा असे म्हणत त्यांनी मोहन भागवत यांच्या भाषणाचा संदर्भ दिला ते म्हणाले सर्वांचे पूर्वज एकाच होते मग विरोधी पक्षाचे पूर्वज परग्रहावरील होते का नुकतेच मारले गेलेल्या शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरील आले होते का? हिंदुत्वाला परकियांपासून नव्हे तर आता उगवलेल्या नव हिंदुत्ववादी लोकांपासून धोका आहे.भाजपचे धोरण हे छापा टाकायचा आणि काटा काढायचा असे आहे .माझे शिवसैनिक त्यांच्या पालखीचे भोयी झाले नाहीत म्हणून त्यांना भ्रष्टाचारी ठरवले जातेय.पण तुमच्या पालख्या वाहायला आमचा जन्म झालेला नाही .गटारातले पाणी यांच्याकडे गेली की गंगा आणि बाजूला टाकले की गटारगंगा याला हिंदुत्व म्हणायचे का असा सवाल त्यांनी केला यावेळी केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या राज्यांशी कशाप्रकारे सापत्न भावाने वागते ते सांगून केंद्र व राज्य यांच्या अधिकाराच्या बाबत संघ राज्यावर चर्चा घडवून आणायला हवी आणि त्यासाठी सर्व राज्यांनी एकत्र यायला हवे असे सांगितले.साकीनाका घटनेबद्दल बोलताना महाराष्ट्रात माता भगिनीवर अत्याचार कदापि सहन करून घेतले जाणार नाहीत त्या नराधमाला लवकरात लवकर कठोर शिक्षा होईल या प्रकरणी राज्यपालांनी मला पत्र लिहून दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवायला सांगितले पण महिलांवरील अत्याचाराचा हा प्रश्न एकट्या महाराष्ट्र पुरता नसल्याने तुम्हीच मोदींना या प्रश्नावर संसदेचे अधिवेशन बोलवायला सांगा असे कल्वल्याचे सांगितले.भारताची घटना लिहिलं जात असताना काहींनी बाबासाहेबाना विचारले होते की केंद्राला आणि राज्यांना योग्य अधिकार राहतील का त्यावर बाबासाहेब म्हणाले होते की केंद्र एवढीच सर्व राज्य सार्वभौम राहतील असे बाबासाहेबांनी सांगितले होते म्हणूनच राज्यांच्या कारभारात केंद्राची ढवळाढवळ नको असेही ते म्हणाले.महाराष्ट्रात काय झाले की लोकशाहीचा खून झाला असा गळा काढायचे मग युपी मध्ये काय लोकशाहीचा मळा फुललाय.माहितीनुसार अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार सी एस आर च ११राज्यांचा निधी गुजरातकडे वळवण्यात आलाय शिवाय मोदी सरकार केंद्रात आल्यापासून सर्वात जास्त निधी गुजरातला मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला उटव ठाकरे यांनी फडणवीसांच्या टीका करताना ते म्हणाले की मी मुख्यमंत्री आहे असं मला आणि जनतेला सुधा वाटत नये केवळ मी त्यांच्या कुटुंबातला आहे असे वाटायला हवे . पण काही लोकांना मात्र ते सतेमध्ये नसतानाही त्यांना आपणच सते मध्ये आहोत असे वाटतेय अशा पद्धतीने काल मुख्यमंत्र्यांनी फक्त आणि फक्त भाजपला च टार्गेट केले .

error: Content is protected !!