ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

सचिन वाझे यांच्या वर ओपन हार्ट सर्जरी


प्रतिनिधी/ मुंबई उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेले बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची काल मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली . शस्त्रक्रियेसाठी वाझे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती कालच त्याच्या वकिलांनी दिली होती .वाझेच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानुसार सोमवारी सचिन वाझे मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात दाखल झाले होते .आज मंगळवारी वाझेंवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली . ही शस्त्रक्रिया कार्डिअक सर्जन डॉ कमलेश जैन, कार्डिओलॉजिस्ट डॉ अंकुर आणि डॉ केदार यांच्या पथकाने केली .सद्या सचिन वाझेची प्रकृती स्थिर आहे

error: Content is protected !!