ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राम मंदिर उडवून देण्याची धमकी अयोध्येत खळबळ

लखनौ – अयोध्येतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांनी अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. दहशतवाद्यांच्या जैश ए मोहम्मद नावाच्या संघटनेने मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. दहशतवाद्यांनी ऑडिओ क्लिप पाठवून मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून ऑडिओ क्लिपची तपासणी सुरू आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
संबंधित ऑडिओ क्लिपची ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही. पण या ऑडिओ क्लिपमुळे बोलणारी व्यक्ती आपलं नाव आमिर असल्याचं सांगतोय. तो राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी देतोय. “
संबंधित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर गुप्तचर यंत्रणांपासून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाले आहेत. राम मंदिरसह काही प्रमुख प्रतिष्ठानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2005 मध्ये रामजन्मभूमीवर दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यामागे जैश ए मौहम्मद याच संघटनेचा हात होता हे नंतर समोर आलं होतं. जैशकडून वारंवार अशाप्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.

error: Content is protected !!