ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर लष्कराच्या सन्मानार्थ मुंबईसह देशभर भाजपाची तिरंगा यात्रा


मुंबई/पाकिस्तान विरुद्ध च्या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्कराने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल आज पासून देशभर लष्कराच्या सन्मानार्थ तिरंगी रॅली काढल्या जात आहेत 23 तारखेपर्यंत रॅली काढल्या जातील दरम्यान आज महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅली सुन बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान अशा घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या तसेच भारतीय सैन्याच्या शौर्य बद्दल सैन्याचे तोंड भरून कौतुक केले
भारतीय सेनेने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर यशस्वीपणे राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या धाडसी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल भारतीय सेनेचे आभार मानण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत आज भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर या रॅलीचा समारोप झाला.
समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार, पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे अनेक नेते आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय सेनेच्या पराक्रमाचे जाहीर कौतुक केले आणि पाकिस्तानला दिलेल्या कडक प्रत्युत्तराचा उल्लेख करत देशवासियांना अभिमानाची जाणीव करून दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ऑपरेश सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सेनेने दाखवून दिले, हमें कोई झुका नहीं सकता, हम ना झुकेंगे, न बिकेंगे, न थकेंगे अशा प्रकारे भारतीय सेनेची ताकद काय आहे? ही ताकद आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहलगामध्ये आमच्या २६ बांधवांना ज्याप्रकारे धर्म विचारून मारण्यात आले. कुटुंबासमोर मारण्यात आले. बायकोसमोर नवऱ्याला मारले, मुलांसमोर बापाला मारले, अशा प्रकारचे बर्बरतापूर्ण हत्याकांड या भारताच्या नव्हे, तर जगाच्या इतिहार पाहायला मिळाले नव्हते.
मोदीच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर है लॉन्च केले. आमच्या भगिनींचे कुंकू पुसण्याचे काम ज्या दहशतवाद्यांनी आणि ज्या देशाने केले होते, त्याला मेस्तनाबूत करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली. ऑपरेशन सिंदूरमध्ये अतिशय अचूक पद्धतीने भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करून टाकले, असे फडणवीस म्हणाले.ते पुढे म्हणाले मला सर्वात जास्त आनंद कशाचा असेल, तर ज्या ठिकाणी हरामखोर कसाबने प्रशिक्षण घेतले. तो अड्डा देखील नेस्तनाबूत करण्याचे काम केले. इतकेच नाही, तर आपल्या मुंबईचे अपराधी असलेले मकसूद अजहर, अबू जिंदल त्यांनाही ठोकण्याचे काम आपल्या सैन्याने केले. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात शेवटच्या टोकाला जिथे त्यांना वाटायचे इथे कधीच भारतीय सेना पोहोचू शकत नाही. म्हणून सगळ्या आतंकवाद्यांना सगळ्या परिवारासह राहण्यासाठी जागा दिली होती. ज्या ठिकाणी या आतंकवाद्यांसाठी सेफ हाउस तयार केले होते. नेमके तिथेच जाऊन भारतीय सेनेने ठोकले आणि सगळे अड्डे उद्ध्वस्त केले.

error: Content is protected !!