[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका आयुक्तांनी केली नाल्यांची पाहणी

मुंबई/ पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाई व्यवस्थित व्हायला हवी अन्यथा मुंबईत ठिकठिकाणी मुंबईत पाणी तुंबते आणि त्याचा मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होतो तसेच नागरिकांनाही त्रास होतो म्हणून काल मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चाहल यांनी नाले सफाईची पाहणी केली तसेच 15 मे च्या पूर्वी नालेसफाईची सर्व कामे पूर्ण व्हायला हवीत असे आदेश दिले आहेत.नाले सफाईच्या कामात दरवर्षी मोठा भ्रष्टाचार होतो प्रत्यक्ष नाले सफाई पासून ते नाल्यातील काढलेल्या गाळाच्या वजना पर्यंत प्रत्येक टप्प्यावर ठेकेदार पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने पालिकेला चुना लावतात पण यंदाचे निवडणुकीचे वर्ष असल्याने नाले सफाईच्या कामत थोडा जरी भ्रष्टाचार झाला तरी त्याचे परिणाम पालिका निवडणुकीत सताधरि शिवसेनेला भोगावे लागतील .

error: Content is protected !!