उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी शिंदेच्या हालचाली ?
नवी दिल्ली/उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्याची तयारी चालवली असल्याचे समजते.त्यासाठीच ते सतत दिल्ली वाऱ्या करीत असल्याचे बोलले जात आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. शिंदे गेल्या महिन्याभरात तीनदा दिल्लीला गेले आहेत. यातील आधीच्या दोन दौऱ्यांमध्ये त्यांनी मोदी, शहांची भेट मिळालेली नव्हती. पण गेल्या आठवड्यात त्यांना दोन्ही नेते भेटले. संसदेचं अधिवेशन सुरु असतानाही त्यांनी शिंदे यांना वेळही दिला. या बैठकांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.
महायुती सरकारमध्ये असलेले शिंदेसेनेचे नेते, मंत्री सातत्यानं अडचणीत येत आहेत. त्यांना अडचणीत आणण्यामागे सरकारमधीलच काही जण असल्याची चर्चा होते. शिंदेंचे मंत्री तशी शंका खासगीत व्यक्त करतात. या संदर्भात शिंदे यांची मोदी, शहांशी चर्चा झाल्याची माहिती आहे. महायुतीत लक्ष घालण्याची विनंती शहांनी दोन्ही नेत्यांकडे केल्याचं समजतं. यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे बहुतांश खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे यांनी दिल्ली भेटीत भाजपच्या नेतृत्त्वाकडे केल्याची माहिती आहे. ठाकरेंचे लोकसभेत ९ खासदार आहेत. यातील १-२ खासदार वगळता अन्य खासदार संपर्कात असल्याचा शिंदेंचा दावा आहे. हे खासदार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवाराला मतदान करु शकतात. तसं घडल्यास तो ठाकरेसेना आणि इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का असेल.निवडणुकांसंदर्भातही चर्चा झाली.
