[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यानवी मुंबईमुंबई

जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या ६ विद्यार्थ्यांची शाळेतून हकालपट्टी

नवी मुंबई : शाळेतच दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ अशी घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर शाळा प्रशासनानं कठोर पाऊल उचलतं ६ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आहे. यामुळं खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील वाशी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला आहे.माध्यमांतील वृत्तानुसार, सोमवारी सकाळी शाळेतील बाथरुममध्ये जय श्रीरामच्या घोषणा दिल्याचा प्रकार घडल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही घोषणाबाजी केली ते इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थी आहेत.
प्रकार शाळा प्रशासनाच्या कानावर आल्यानंतर मुख्याध्यापकांनी घोषणाबाजी करणाऱ्या ६ विद्यार्थ्यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे

error: Content is protected !!