[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

कार्यकारी अभियंता पाडुरंग दाभाडे निवृत्त होणार


मुंबई- आपल्या चांगल्या कामाने व मनमिळावू स्वभावाने सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय कार्यकारी अभियंता पांडुरंग नामदेव दाभाडे लवकरच  निवृत्त होणार आहेत  ते पर्जन्य जलवाहिनी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
       1990 साली रस्ते विभागात रुजू झालेल्या पांडुरंग दाभाडे यांनी पुढे दक्षता विभाग, इमारत कारखाने आदी विभागात काम केले. पर्जन्य जलवाहिनी शहर कार्यकारी अभियता असा यशस्वी कर्तव्य बजावले.  कोविड काळात त्यांनी शहर विभागातील नालेसफाईचे काम वेळेत पूर्ण करून साथीचे रोग पसरणार नाहीत याची काळजी घेतली. आपल्या पालिका सेवेत वेगवेगळ्या विभागात काम करताना त्यांनी त्या विभागात आपल्या कामाचा ठसा उमटवला असे हे कर्तव्य तत्पर दाभाडे आता निवृत्त होणार आहेत.

error: Content is protected !!