[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेतून निलंबित केलेल्या विष्णू घुमरे याला अटक होणार

मुंबई/ पालिकेच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना कोणत्याही वित्तीय संचालक पदावर नियमानुसार राहता येत नाही असे असतानाही पालिका कर्मचारी एकाच वेळी दोनदोन नोकऱ्या करतात त्यांची पालिकेतील नोकरी केवळ हजेरी पाटावर असते वरिष्ठांना लाच देऊन फक्त पालिकेत हजेरी लावून घ्यायची आणि काम दुसरीकडे करून पालिकेला चुना लावायचा असे बरेच प्रकार पालिकेत सुरू आहेत . पण विष्णू घुमरे या पालिका कर्मचाऱ्याने तर पालिकेची नोकरी करीत असताना चक्क मुंबई बँकेची निवडणूक लढवून संचालक बनला इतकेच नाही तर वेगवेगळ्या कंपन्या दाखवून कंत्राटे मिळवली पण त्याचे हे झोल उघडकीस येताच पालिका आयुक्तांनी त्याला निलंबित केले आहे . त्याच्या सोबत त्याचे आणखी दोन साथीदार आहेत आता या लोकांनी पालिकेला फसवल्याबद्दल पालिका त्यांच्यावर गुन्हा दखल करण्याची शक्यता आहे . त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे अटक झाली तर त्याचे मुंबई बँकेतील घोटाळे बाहेर येतील असे बोलले जातेय .

error: Content is protected !!