ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

गृहनिर्माण खात्याची मोठी फजिती परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की म्हाडाचा पेपर फुटला


मुंबई/ वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात गटांगळ्या घेणाऱ्या गृह निर्माण खात्याला आणखी एक झटका बसला आहे म्हाडाच्या विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की गृहनिर्माण खात्यावर ओढवली आहे
म्हाडाच्या नोकर भरतीसाठी अनेक उमेदवार उत्सुक असतात त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची खूप दिवस अगोदरपासून तयारी केली जाते यावेळी म्हाडाच्या विविध पदाच्या भरतीसाठी परीक्षा होणार होती पहिला पेपर काल रविवारी होता पण मध्यरात्री एक विद्यार्थ्याने पुणे पोलिसांना फोन करून म्हाडाच्या रविवारी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती दिली तशी पोलिसांची तारांबळ उडाली आणि युद्ध पातळीवर चौकशी सुरु झाली तेंव्हा पेपर फुटल्याची माहिती खरी असल्याचे त्यांना समजले त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे दकलात असल्याचे जाहीर करून या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली दरम्यान या पेपर फुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली असून हे मोठे रॅकेट असावे असा पोलिसांना संशय असल्याने या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करून त्यांची कसून चौकशी केली जात आहे तर दुसरीकडे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे

error: Content is protected !!