[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेमहाराष्ट्र

साकीनाका बलात्कार हत्या प्रकरणातील मृत महिलेच्या मुलींना सरकार देणार 20 लाखांची मदत

: मुंबई साकीनाका येथील बलात्कार झालेल्या महिलेच्या मृत्यू नंतर तिच्या मुलांच्या संगोपणाची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली असून तिच्या मुलींना सरकारी योजनेतून 20 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे . काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदार यांना बैठकीसाठी बोलावून घेतले होते .या घटनेकडे सरकार अत्यंत गांभिर्‍याने पाहत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी संगितले .तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलली असून मुंबई पोलिसांनी शहरातील टपोरी चारशी गरदूलले तसेच पोलिस रेकॉर्ड वरील दाखलेबाज गुंडा विरूढ एक मोहीम उघडली आहे . सह्याद्रि अतिथिगृहावर झालेल्या या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्य सचिव सीताराम कुंटे पोलिस महासंचालक संजय पांडे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुखी सचिव आशीष कुमार सिंह पोलिस आयुक्त हेमंत नगरले ,सह पोलिस आयुक्त विश्ब्वस नगरे पाटील आदि हजर होते .

error: Content is protected !!