[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अमेरिकेत दरवळला मराठी संस्कृतीचा सुगंध

बृहन्ममहाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला दिमाखात सुरुवात

न्युजर्सी, दि. १३ ( प्रतिनिधी)- मराठी माती, मराठी संस्कृतीचा सुगंध उत्तर अमेरिकेतील न्यूजर्सीच्या अटलांटिक सिटीत सध्या दरवळतो आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या दर दोन वर्षांनी होणा-या अधिवेशनाची मोठ्या दिमाखतात आज सुरवाती झाली. या अधिवेशनाला सुमारे ५००० मराठी रसिकांनी उपस्थित लावली.

यंदाच्या अधिवेशनाचे यजमानपद न्युजर्सीच्या मराठी विश्व या संस्थेकडे आहे. प्रमूख पाहुणे प्रसिध्द अभिनेते अमोल पालेकर. पर्सिस्टंट सिस्टीमचे डॉ. आनंद देशपांडे, अध्यक्षा विद्या जोशी ह्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी संचालक प्रशांत केल्हटकर आणि मराठी विश्व न्यूजर्सीचे अध्यक्ष अतुल आठवले, सह – संयोजक अमर उर्हेकर, कोषाध्यक्ष विहार देशपांडे, मराठी विश्वचे अध्यक्ष अतुल आठवले, सचिव कोमल चौकर, विश्वस्त मोहित चिटणीस, तसेच प्रकल्प व्यवस्थापक मुकुल डाकवाले मंचावर उपस्थीत होते.

दर्जेदार सांस्कृतिक मनोरंजन, ज्ञान उद्योग, शिक्षण संधी, नोकरीची संधी, मिळत्या जुळत्या विचारांचा जीवनसाथी मिळविण्याची संधी, भेटीगाठी,संवाद, खाद्यपदार्थांची रेलचेल,तारे तारकांची उपस्थिती,भरघोस बक्षिसे,तसच नवनवीन कल्पनांची बहार या अघिवेशनात अनुभवायला मिळते आहे.

मराठी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यावसायिकांना पाठिंबा देण्यासाठी बिझीनेस समीट तसच बिझीनेस कॉन्फरन्स पद्मश्री डॉ. श्रीकांत दातार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडली.महाराष्ट्रीय व्यापारी समुदायाला प्रोत्साहन देणे,शिक्षीत आणि सक्षम करणे हा त्या मागचा मुख्य हेतू. दुसरा महत्वाचा कार्यक्रम ठरला तो म्हणजे एज्युकेशन समिट ,विद्यार्थ्यांना भारत आणि अमेरिकेतील विद्यापिठांशी जोडणारा एक महत्वाचा दुवा,ज्येष्ठ नागरिकांचा उत्तर रंग हा कार्यक्रम देखील चांगलाच रंगला. उपस्थित होते. डॉ. आनंद देशपांडे ह्यांचा जीवन पट त्यांच्याच शब्दात ऐकताना उपस्थित उपस्थितांचा उर आदराने भरून आला

मराठी विश्व आणि थिएट्राक्स यांनी सादर केलेला शुभारंभाचा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी एक पर्वणी होती.ऋषिकेश कामेरकर यांनी रचलेल्या, मंत्रमुग्ध करणा-या संगीतासह नेत्रदीपक नृत्यनाट्याचा आनंद घेत होणार संमेलनाची जोरदार सुरुवात झाली. त्यानंतर एक अनोखे गूढ थ्रिलर नाटक शाबरी, स्वररंग,जादूगार रघूवीर मॅजीक शो, नाट्यछटा,व्यक्तीचित्रे, प्रासंगीक विनोद, एकपात्री ह्यांवर आधारीत,निखळ निर्भेळ आणि शुध्द विनोदाचा नाविन्यपूर्ण असा हा हास्य धबधबा.मराठी अस्तित्व, टीन्स डान्स वर्कशॉप बाय डान्स क्वीन स्वराली, गेम स्पर्धा फॉर टीनेजर्स, वायएवाय यूथ आईस ब्रेकर, रंगश्वास- एक सशक्त मराठी कथांचा नजराणा, सोनाली कुलकर्णी,विष्णू मनोहर, ह्यांच्या सोबत गप्पा टप्पा, रेशीमगाठी,अंतरीच्या गूढगर्भी, गप्पा गोष्टी विथ न्यूट्रीशन स्पेशालिस्ट ,स्वररंग,Shakespeare experiment ,प्रसिध्द ज्योतिषी संदीप अवचट ह्यांच्या दिलखुलास राशी ह्या कार्यक्रमाने रंगत आणली.आणि शेवटी सारखं काहीतरी होतय हे प्रसिध्द नाटक सादर होत एक से एक कार्यक्रमांची लयलूट प्रेक्षकांनी अनुभवली..

फोटोओळ

हजारो रसिकांच्या उपस्थितीत बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २० व्या अघिवेशनाचा भव्य उद्घाटन सोहळा १२ ऑगस्टला न्युजर्सीत पार पडला. यावेळी प्रसिध्द अभिनेते अमोल पालेकर. पर्सिस्टंट सिस्टीमचे डॉ. आनंद देशपांडे, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी., संयोजक प्रशांत केल्हटकर उपस्थित होते.

error: Content is protected !!