आमदाबाद मध्ये भीषण विमान अपघातमाजी मुख्यमंत्री विजय रुपानी सह २९७ जणांचा मृत्यू – विमानातील २४१तर विमान कोसळलेल्या हॉस्टेल मधील ५६ जण प्राणास मुकले
अहमदाबाद/ गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एक भीषण विमान दुर्घटना घडली. आमदाबाद वरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७/८ ए १७१ हे प्रवासी विमान टेक ऑफ नंतर अवघ्या दोन मिनिटात मेडिकल हॉस्टेलवर कोसळून विमानाचा स्फोट झाला. या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी त्यांच्यासह विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला मात्र १ प्रवासी आचार्यकारित्या बचावले.दरम्यान हे विमान ज्या मेडिकल हॉस्टेलवर कोसळले तिथल्या ५६ जणांचा मृत्यू झाला तर ५० पेक्षा अधिक लोक जखमी आहेत .या अपघात विमान प्रवासी व हॉटेल मधील लोक मिळून २७५ जणाचा मृत्यू झाला मृतांमध्ये 2 पायलट व 10 विमान कर्मचाऱ्यांची समावेश आहे.सरकारने या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
दुपारी दीड वाजता आमदाबाद विमानतळावरून एअर इंडिया चे एक प्रवासी विमान लंडन कडे निघाले होते .मात्र विमानाच्या टेक ऑफ नंतर अवघ्या दोन मिनिटात हे विमान जवळच असलेल्या मेडिकल हॉटेलच्या इमारतीवर धडकले आणि त्याचा स्फोट झाला. अपघातापूर्वी पायलटने एटीसी ला एम ए वाय डी ए वाय हा धोक्याचा कॉल केला होता. त्यानंतर काही सेकंदात जोरदार धमाका झाला आणि विमान कोसळले या विमानात १६९ भारतीय तर ५३ ब्रिटिश प्रवासी १२ विमान कर्मचारी. होते विशेष म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपांनी हे सुद्धा होते. त्यांचाही मृत्यू झाला . प्रार्थमिक माहितीनुसार विमानाच्या लिथियम बॅटरी मध्ये आग लागल्याने स्फोट झाल्याचे समजते .सरकारने या विमान अपघाताचे चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान हे विमान ज्या मेडिकल हॉस्टेलवर कोसळले तिथल्या ७५ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींना आमदाबादच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे .या विमान दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुरमुक यांच्यासह विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.ज्या भागात हे विमान कोसळले त्या भागात बराच वेळ आग आणि धुराचे लोट उसळले होते. त्यामुळे परिसरात प्रचंड घबराट माजली होती .अपघाताच्या घटनेचे वृत्त समजताच तत्काळ घटनास्थळी रुग्णवाहिकांसह बचाव पथक पोहचले मात्र विमानातील प्रवाशांचा जळून कोळसा झाला होता त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांच्या डी एन ए वरून मृतांची ओळख पटवली जात आहे. अपघाताची माहिती समजताच गृहमंत्री अमित शहा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि त्यांचे सहकारी मंत्री घटनास्थळी पोहचले तसेच रुग्णालयात जाऊन जखमी विचारपूस केली. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री पटेल व अमित शहांकडून अपघाताची सविस्तर माहिती घेऊन तीव्र दुःख व्यक्त केले.आता विमानाचा ब्लॅकबॉक्स आणि रेकॉर्डर सापडल्यावरच अपघाताचे नेमके कारण समजणार आहे.१९८८ नंतर अहमदाबादमध्ये झालेला हा दुसरा मोठा विमान अपघात आहे.
मेडिकल हॉस्टेलवर विमान कोसळले
आमदाबाद मधील एअर इंडियाचे बोईन ७८७/८ ड्रीम लाइनर ए १७१ हे विमान टेक ऑफ नंतर अवघ्या दोन मिनिटात विमानतळा जवळच असलेल्या मेडिकल हॉस्टेलवर कोसळले. या अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर पण ज्या मेडिकल हॉस्टेलवर हे विमान कोसळले त्या मेडिकल हॉस्टेलमधील ५६ जणांचा मृत्यू झाला.यातील बहुसंख्य शिकाऊ डॉक्टर होते. तर या अपघातात ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान विमानातील प्रवाशांचा जळून कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना डीएनए चाचणीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
