[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

जुहूच्या समुद्रात ५ मुले बुडाली एकाला वाचवण्यात यश

मुंबई: जुहू कोळीवाडा चौपाटी परिसरात आज संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. वाकोला परिसरामधून पोहायला आलेल्या आठ लहान मुलांपैकी ५ मुलं बुडाल्याची माहिती समोर येत आहे.यापैकी एकाला वाचवण्यात यश आले आहे तर चौघांचा शोध सुरु आहे .या चोघांमध्ये जय रोशन ताजबरिया १५,शुभम योगेश योगनिया १५,मनीष योगेश योगनिया १२,आणि धर्मेश वल्जी फौजिया १६ यांचा समावेश आहे.
बी परजॉय चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्रात गेल्या दोन दिवसापासून मोठमोठ्या लाटा उठत असल्याचं दिसून येतंय. याच समुद्राच्या लाटांमध्ये वाकोला परिसरांमधून आलेल्या ५ लहान मुले बुडाली या घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस, मुंबई महानगरपालिकेचे लाईफ गार्ड आणि कोस्टगार्ड घटनास्थळी पोहोचले आहेत. या भागात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

error: Content is protected !!