ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अनधिकृत इमारत वाचवण्यासाठी ७५ लाखांची लाच घेताना पालिकेचा लाचखोर  अभियंता मंदार  तारीला अटक

मुंबई -मुंबई सारख्या महानगरात अनधिकृत बांधकामे कोणामुळे होतात आणि ती वाचवणारे भूमाफियांचे पालिकेतील दलाल अधिकारी कोण हे अनेक वेळा उघडकीस आले आहे. पण या चोरांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते इतके माजलेत कि आता अनधिकृत इमारती वाचवण्याच्या सुपार्या घेत आहेत. अशाच एका लाचखोर अभियंताला ७५ लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या २ साथीदारांसह अटक केली त्यामुळे पालिकेतील इतर लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
     मुंबईत अनेक इमारती अशा आहेत कि ज्यांना  चार माळ्यांची परमिशन असली तरी बिल्डरांनी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून   माळे बेकायदेशीरपणे त्यावर चंढवलेले आहे. पालिका अधिकाऱ्यांना मोठी लाच दिली कि या गोष्टी होतात .
       एका ४ माळ्याची परमिशन असलेल्या इमारतीवर बिल्डरने  २ अनधिकृत माळे चढवले होते वास्तविक पालिकेचा पगार घेणाऱ्या व कार्यकारी अभियंता असलेल्या मंदार तारी याने  या इमारतीवर कारवाई करण्या ऐवजी २ अनधिकृत माळे वाचवण्यासाठी २ कोटींची  लाच मागितली  होती पण या प्रकरणी मंदारला लाच देण्याऐवजी त्याची लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदवली त्यानंतर एसीबीचे अप्पर आयुक्त संदीप दिवाण यांनी सापळा लावला आणि तारीला ७५ लाखांची लाच घेतं अटक केली त्याच्या सोबत प्रतीक पिसे व मोहम्मद शहा या त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली.
      मुंबई जनसत्ताने काही वर्षापूर्वी  डी प्रभागाचे पालिकेचा सहाय्यक अभियंता असताना याचे  बेकायदेशीर कारनामे उघडकीस आणले होते .पण त्यावेळी पालिकेतील सरकारमध्ये असलेल्या त्याच्या माय बापानी त्याला वाचवले. मुंबई सेंट्रल येथे उद्यानाच्या बांधकामात कारनामे केले होते . पण आता पालिकेत सरकारच नसल्याने त्याला वाचवणारा कोणी नव्हता .

error: Content is protected !!