[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

रखडलेल्या प्रकल्पांबाबत आयुक्तांना आदित्यचे पत्र


ठाकरे – शिंदे गटात विकासकामांच्या श्रेयवादावरून लढाई
मुंबई – पंतप्रधान मोदी हे १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत . या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पालिकेच्या विकास कामांचा शुभारंभ होणार आहे . मात्र यातील काही कामे महाविकास आघाडीच्या काळात सुरु झाली आहेत . पण आता मात्र ती रखडली आहेत . या रखडलेल्या कामांबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एक पत्र लिहून पालिका आयुक्त इकबालसिंग चहल याना जाब विचारला आहे. त्यामुळे आता ठाकरे व शिंदे गटात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारीला मुंबईत पालिकेच्या कामांचा शुभारंभ होणार आहे. बीकेसी येथे हा कार्यक्रम होणार आहे.मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात आले आहेत.
पालिकेची तीन रुग्णालये, मलनिस्सारण प्लांट, सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते, पंतप्रधान स्वनिधी निधी योजना अशा विविध कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार
आपली चिकित्सा योजने अंतर्गत भांडुप सुपर स्पेशालिटी, ओशिवरा प्रसुतीगृह, गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालय यांच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे.
तसेच ७ मलनिस्सारण प्लांट आणि मुंबईत होणारे किलोमीटरचे सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते याचे भूमिपूजन होणार
1 हजार७५० कोटी रुपये खर्चून मुंबईचे सौंदर्यीकरण अशा विविध पाचशेहून अधिक कामांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
त्यामुळे बीएमसी निवडणुकांच्या आधी मुंबईवर लक्ष केंद्रित करत या विकास कामांच्या उद्घाटन करण्याचे नियोजन करून याचं पूर्ण शिंदे फडणवीस सरकार घेणार असल्याचे चित्र आहे
महाविकास आघाडीच्या काळात रखडलेले प्रस्तावित प्रकल्प आणि त्यात मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने खास मुंबईकरांसाठी सुरू केलेल्या विकास कामांचे प्रकल्प… या सगळ्याच प्रकल्पाचा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात लोकार्पण उद्घाटन होत आहे. त्यामुळे अर्थातच आधीच्या सरकारमधील प्रस्तावित प्रकल्पावरून श्रेयवाद होणार आणि त्याचा पहिला अध्याय या प्रकल्पावरून पाहायला मिळतोय. आता या श्रेयवादाच्या लढाईचा कोणाला कितपत फायदा होतो ? हे बीएमसी निवडणुकातच कळणार आहे.

error: Content is protected !!