ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

मालेगांवात कोविड लस न देता ऑनलाईन प्रमाणपत्र- १० उर्दू शिक्षकांवर निलंबनाची कारवाई

मालेगांव-कोरोनाची सर्वाधिक झळ सोसलेल्या मालेगावात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याची चिंता प्रशासनाला सतावत असताना लस न देताच कोविन अ‍ॅपवर नोंदणी करुन ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी १० उर्दू शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने चौकशी हाती घेतली आहे. त्यात अजून काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

error: Content is protected !!