ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मनोरंजनमुंबई

भुज, शेर शहा आणि नेत्रिकण्णा ओटीटीवर धूम माजवणार .

भुज आणि नेत्रिकण्णा : 13 ऑगस्ट रोजी, अजय देवगण ओटीटीवर धूम माजवणार आहे. ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवस आधी रिलीज होईल. अनेक दिवसांपासून या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, 13 ऑगस्टला हॉटस्टार व्हीआयपीवर नेत्रिकण्णा हा तामिळ चित्रपटही प्रदर्शित होईल. या चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होईल.

शेर शहा : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी स्टारर ‘शेरशाह’ चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. ट्रेलर लाँचसाठी संपूर्ण कास्ट कारगिलला पोहोचली होते. विक्रम बत्रांच्या कथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खूप मनोरंजक ठरू शकतो. हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी Amazon प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
नाईन परफेक्ट स्ट्रेंजर : नाईन परफेक्ट स्ट्रेंजर 18 ऑगस्ट रोजी Amazon प्राइम व्हिडीओवर रिलीज होईल. टिफनी बून, बॉबी कॅनवेल आणि ल्यूक इव्हान्सची ही सीरीज एक रहस्यमय थ्रिलर आहे. डेव्हिड ई केली आणि जॉन हेन्री बटरवर्थ यांच्या नाईन परफेक्ट स्ट्रेंजर नावाच्या कादंबरीची ही कथा आहे

error: Content is protected !!