ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

हॅलो मी शरद पवार बोलतोय!


बदलीसाठी पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन करणाऱ्यास अटक
मुंबई/आजकाल लोक काय करतील याचा नेम नाही.पूर्वी तोट्या पोलीस, तोतया सरकारी अधिकारी इतकेच काय तर चेहऱ्या मध्ये साम्य असलेले तोतया नवरोबा सुधा पाहिलेत .बॉलिवूडच्या हिरोंचे डुप्लीकेटआजही सिनेसृष्टीत सक्रिय आहेत आणि ते हुबेहूब त्या हिरो सारखा आवाज काढतात.पण एका भामट्याने मात्र सर्वांना लाजवेल असे धाडसी कृत्य केले आहे त्याने चक्क राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजात मुख्यमंत्री कार्यालयात बदलीसाठी फोन केला मात्र हा फोन कॉल फेक असल्याचे लक्षात येताच मंत्रालयात एकाच खळबळ उडाली त्यानंतर घाई घाईने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आणि पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून याच माणसाने पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन केला असल्याचा संशय आहे खुद्द पवार सुधा या घटनेने अचंबित झाले आहेत

error: Content is protected !!