ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आम्ही दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारले – ऑपरेशन सिंदूरच्याच्या यशाची लष्कराकडून ग्वाही

नवी दिल्ली/पाकिस्तानात असे एकही ठिकाण नाही जिथे आम्ही हल्ला करू शकत नाही. पाकिस्तानात घुसून आम्ही दहशतवाद्यांचे तळ आणि पाकिस्तानी एअर बेस उध्वस्त केले. आमच्या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी आणि पन्नास पन्नास हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले तर आमचे ५ जवान शहीद झाले.अशा तऱ्हेने आम्ही पहेलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला. असा लष्कराने पत्रकार परिषदेत दावा केला आहे .दरम्यान सोमवारी दुपारी बारा वाजता भारत-पाकिस्तान डी जी एम ओ मध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे
तीन दिवसांच्या युद्धानंतर भारत पाकिस्तान मध्ये शस्त्र संधी झाली होती. परंतु अवघ्या चार तासात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले .त्यानंतर भारतीय लष्कराने पलटवार केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराकडून काय खुलासा केला जातो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. त्यानुसार रविवारी सायंकाळी लष्कराची पत्रकार परिषद झाली. या पत्रकात परिषदेला तिन्ही दलाचे अधिकारी उपस्थित होते .या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूर कशा पद्धतीने राबवण्यात आले. याची सविस्तर माहिती लष्करी अधिकारी एके भारती आणि अन्य दोन अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे नऊ तळ कसे उध्वस्त केले. तसेच पाकिस्तानने केलेले ड्रॉन हल्ले कसे परतवून लावले. याची माहिती देताना दहशतवादाचा खात्मा हेच आमचे उद्दिष्ट होते. त्यामुळे आम्ही पाकिस्तानातील नागरी वस्ती किंवा विमानतळांना लक्ष केले नाही. मात्र पाचोरा आणि गरुड स्नायपर्स सारख्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानी ड्रॉन पडले.आमच्या हल्ल्यात रौफ,मुद्दसर, नासीर अझर सारख्या खतरनाक दहशतवाद्यांसह १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. तर शस्त्रसंधी नंतर पाकिस्तान कडून झालेल्या हल्ल्याला आम्ही यशस्वीपणे तोंड देत पाकिस्तानचे ४० सैनिक मारले.पाकिस्तानची रडार यंत्रणा नष्ट केली.पाकिस्तानचे अनेक एअर बेस नष्ट केले. सुकुर शेल्टर एअर क्रॉफ्ट नष्ट केले.मात्र पाकिस्तानकडून आमची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केल्याचा प्रचार केला जातोय .तो पूर्णपणे खोटा आहे.आमची एअर डिफेन्स सिस्टीम सुरक्षित असून याच सिस्टिमनने पाकिस्तानचे सर्व ड्रॉन आणि फायटर जेट्स पाडले. आम्ही भक्कम आणि तयारीनिशी होतो म्हणून पाकिस्तानी सैन्याला बॉर्डर क्रॉस करता आली नाही .हवाई दल,आणि नव्हीने पाकिस्तानची हालत खराब करून टाकली असेही लष्कराकडून सांगण्यात आले.एकीकडे आम्ही अतिरेकी तळांवर हल्ले करीत असताना, पाकिस्तानी सैन्याने मात्र सीमेवरील निष्पाप नागरिकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला.पण आता आम्ही स्वस्थ बसणार नाही वेळ आली तर पुन्हा पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करू असेही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले

error: Content is protected !!