[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत – संजय मंडलिक यांच्या विधानाने वातावरण तापले

कोल्हापूर – कोल्हापूरात राजकीय वातावरण तापण्याची जोरदार शक्यता आहे. महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू छत्रपती यांना लोकसभेचे तिकीट दिलं आहे. तर भाजपने खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा संधी दिली. दरम्यान प्रचार सभे दरम्यान खासदार संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान समोर आलं आहे. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी हे विधान केलं आहे.
संजय मंडलिक म्हणाले, “आत्ताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि कोल्हापूरची जनता खरी वारसदार आहेत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला”
म ल्लाला हातचं मारायचा नाही. मल्लाला टांग मारायची नाही. मग कुस्ती होणार कशी? असा सवाल संजय मंडलिक यांनी उपस्थित केला.
संजय मंडलिक यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आता शाहु छत्रपती याला कसं उत्तर देणार हे महत्वाचं आहे. यावेळी व्यक्तिगत टीका टाळा म्हणून हसम मुश्रीफ यांनी सल्ला दिला होता. मात्र प्रचारात व्यक्तिगत टीका होत असल्याची चर्चा आहे.

error: Content is protected !!