[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात 250 मुंबईकरांनी मांडल्या समस्या

मुंबई, दि. 11 आक्टोबर 2025
मुंबई उपनगर पालकमंत्री एँड आशिष शेलार यांनी आज महापालिका के. पूर्व विभागात जनता दरबार घेऊन मुंबईकरांच्या समस्या ऐकल्या. सुमारे 250 नागरिकांनी या जनता दरबारात हजेरी लावली.

मुंबईतील के. पूर्व महापालिका विभाग कार्यालयात हा जनता दरबार झाला. यापुर्वी माहिम विभागाचा मंत्री आशिष शेलार यांनी दरबार घेऊन जनतेच्या भेटी घेतल्या होत्या. आज अंधेरी विभागातील नागरिक, गृहनिर्माण संस्था, एस आर.ए संस्था आणि विविध समाज घटकातील नागरिकांनी, महापालिका, शासन, पोलीस अशा विविध विभागातील आपल्या समस्या मांडल्या.

याबाबत माध्यमांशी बोलताना एँड आशिष शेलार म्हणाले की,
जनतेच्या समस्या, अडचणींचे निवारण करण्यासाठी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आणि मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे पालकमंत्री आणि सह-पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि आम्ही वॉर्ड निहाय जनता दरबार घेत आहोत. आज अंधेरी येथील के पूर्व विभागात २००-२५० च्या वर नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले, त्याला मार्गी लावण्याचे काम केले. हे सरकार जनताभिमुख आहे. मुंबईकरांना त्यांच्या विभागात जाऊन ही सेवा आम्ही देत आहोत. असे विभागनिहाय जनता दरबारात येत्या काळात होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी स्थानिक आमदार मुरजी पटेल, भाजपाचे माजी नगरसेवक आणि जिल्हा अध्यक्ष ज्ञानमुर्ती शर्मा, अभिजित सामंत, वॉर्ड सहाय्यक आयुक्त, तसेच पोलीस आणि इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केलेल्या टीकेला माध्यमांशी बोलताना उत्तर देताना ते म्हणाले की, हंबरडा फोडण्यापेक्षा स्वत:वर आसूड उगवला असता तर बरे झाले असते उद्धवजी,
कोकणात 3 चक्रीवादळ आली, मदत आम्ही दिली
कर्जमाफी अर्धवट केली, ती आम्ही पूर्ण केली
बांधावर 50,000 ची घोषणा केली, 1-2 रुपयांचे चेक दिले…
सत्तेत असताना ज्यांनी गावांत शेतकरी मारला आणि कोरोनात सामान्य मुंबईकर…
स्वत:ची पापं आठवा, स्वत:वर आसूड उगवण्यापलिकडे तुमच्याकडे काहीही उरणार नाही.
हंबरडा राखून ठेवा, तो मुंबई, संभाजीनगर महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या मदतीला असेल, अशा शब्दांत त्यांनी प्रतिउत्तर दिले.

error: Content is protected !!