[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी दिसत नाहीत का?

मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरले होते. मात्र, हा बंद म्हणजे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा असल्याची टीका भाजप नेत्यांनी केलीय. ‘उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी दिसत नाहीत का? असा खोचक सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय.

error: Content is protected !!