[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आमदार निवासाच्या कँटिनमध्ये राडा शिंदेच्या आमदाराची कर्मचाऱ्याला मारहाण


मुंबई/सत्ता आणि आमदारकीच्या जोरावर मुजोरी दाखवित कोणावरही हात उगारणारे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात निकृष्ट जेवण मिळाल्याच्या कारणावरून तिथल्या कामगाराला मारहाण केली. विधानसभा. अधिवेशन काळातच गायकवाड यांच्या या गुंडागर्दी बद्दल संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असून गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.दरम्यान या घटनेचे अधिवेशनात् तीव्र पडसाद उमटले. आणि विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताच मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांना उचित कारवाई करण्याबाबत सूचना केली आहे.
काही दिवसांपूर्वीच संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्याच्या अगोदर मतदारांना मारण्याची धमकी दिली होती.अशा वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच वादात अडकणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तणूक आमदार निवास कॅन्टीनमध्ये पाहायला मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडीओ समोर आला. आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवलं. पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आल्याने संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा आज विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिलं आहे.त्यांनी सभापतींना गायकवाड यांच्यावरबकर्वै करण्याबाबत सूचना केल्या आहेत.
कर्मचाऱ्यांना मारता, हिंमत असेल तर मंत्र्याला मारा…अशा लोकांचा तुम्ही पाठींबा देणार का..अशा आमदारांचं निलंबन करावं, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. तसेच एका आमदाराने कसं राहावं, बनियन, टॉवेलवर-लुंगीवर आमदार येतो. रस्त्यावर राहताय का?, असंही अनिल परब म्हणाले. यावर मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. असं वर्तन योग्य नाही. तिथून माहिती आली की भाजीला वास येत होता. परंतु मारहाण करणे योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. लोकप्रतिनिधींने मारहाण करणे योग्य नाही.अशा मारहाणीमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. त्यामुळे सभापती यांनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत म्हणाले. तसेच अनिल परबजी टॉवेलवर मारलं किंवा कसंही मारलं, ते चुकीचं आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. दरम्यान या कँटीनचे कंत्राट सरकारनेच दिलेले आहे.आणि ५ वर्षांची त्याला मुदतवाढ सुद्धा दिली आहे.त्यामुळे अशा कंत्राटदाराकडून जर आमदार निवासात निकृष्ट जेवण दिले जात असेल तर त्याला सरकारच जबाबदार आहे.असे विरोधकांनी म्हटले आहे.संजय गायकवाड यांनी मात्र झालेल्या घटनेबद्दल आपल्याला जराही पश्चात्ताप नाही अशी निर्लज्ज प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.त्यावरून त्यांची मुजोरी कुठल्या थराला गेलीय ते दिसते.
आमदार निवासात दिल्या जात असलेल्या निकृष्ट अन्नपदार्थांबाबत एफडीएने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी काल आमदार निवासा मधील त्या कॅन्टीनवर छापा टाकून तिथले अन्नपदार्थ ताब्यात घेतले .त्याची आता लॅब मध्ये तपासणी केली जाणार असून १५ दिवसात अहवाल दिला जाणार आहे. त्यामुळे कॅन्टीन मालकावर कारवाई होणार आहे.

error: Content is protected !!