ज्यांनी युपीतील जनतेला लुटले त्यांना आयुष्यभर तुरुंगात रहावे लागेल/ योगी आदित्यनाथ
लखनौ/उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०१६ आणि त्यापूर्वीच्या भरती प्रक्रियांवर जोरदार टीका केली आहे. अनेक भरती प्रकरणे सीबीआयकडे सोपवावी लागली. एका व्यक्तीने आठ ठिकाणी नाव नोंदवून पैसे घेतले होते. चौकशीत हे सर्व एकाच कुटुंबातील लोक होते, जे पैसे घेऊन भरती करायचे आणि ज्यांनी राज्यातील जनतेची लूट केली. ज्यांनी उत्तर प्रदेशला बीमारू राज्य बनवले, त्यांना येणाऱ्या काळात तुरुंगात आयुष्य काढावे लागेल असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला.
मुख्यमंत्री योगी म्हणाले ती, यूपीची ओळख धोक्यात आली होती. तरुणांना नोकऱ्या मिळत नव्हत्या, मुली असुरक्षित होत्या, व्यापारी हतबल होते आणि शेतकरी आत्महत्येसाठी मजबूर होते. परंपरागत उद्योग बंद होत होते आणि अराजकतेचे वातावरण होते. सणांपूर्वी दंगल उसळायची, पण गेल्या आठ वर्षांत प्रत्येक जिल्हा, समुदाय आणि व्यक्ती उत्साहाने सण साजरे करत आहे. आज सामाजिक सौहार्द आहे, जो राष्ट्रीय एकतेला बळ देतात असं त्यांनी सांगितले. सोमवारी लखनौ येथील लोकभवनात आयोजित मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १११२ कनिष्ठ सहाय्यक आणि २२ एक्सरे टेक्निशियन यांना नियुक्तीपत्र वितरित केली.
आता भरती प्रक्रिया पारदर्शीपणे आणि वेळेवर पूर्ण होते. गेल्या आठ वर्षांत २.१९ लाख पोलिस कर्मचाऱ्यांची भरती झाली. नुकतीच ६०,२४४ पोलिस कर्मचाऱ्यांची भरती पूर्ण झाली. पहिल्या पोलिस भरती केली तेव्हा प्रशिक्षण केंद्रांची कमतरता होती. भरती ५ट्रेनिंग सेंटर नव्हते. जेव्हा आढावा घेतला तेव्हा फक्त तीन हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण एकाच वेळी होऊ शकत होते हे कळले. पण आता यूपीमध्येच ६०,२४४ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
