कबुतरांना कारच्या टपावरून दाणे घालणाऱ्या मुजोर व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
मुंबई/ कबुतरांना दाणे घालण्यास विरोध मनाई करण्याचा न्यायालयाचा आदेश डावलून, कबुतरांन दाणे घालणाऱ्या संकलेचा नावाच्या व्यापाऱ्यावर पालिकेने गुन्हा दाखल करून त्याची गाडी जप्त केली
मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबुतरखान्याच्या परिसरात पक्ष्यांना खाणे टाकण्यास मनाई केल्यानंतर आता जैन समाजातील काही लोकांनी एक नवीन पद्धत सुरु केली आहे. या परिसरातील कबुतरं उपाशी राहू नयेत, यासाठी दादरमध्ये कारच्या टपावर धान्याचा ट्रे ठेवला जात आहे. अशा कार दादर परिसरात फिरवण्याची योजना आखण्यात आली आहे. लालबागमधील महेंद्र संकलेचा या व्यक्तीकडून कबुतरांना खाद्य पुरवण्यासाठी या ‘फिडिंग कार’ चालवल्या जात आहेत. एवढेच नाही तर आणखी 12 गाड्या येणार आहेत, असेही संकलेचा यांनी सांगितले. यावरुन आता शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे आक्रमक झाल्या आहेत. मनीषा कायंदे यांनी या सगळ्यावर सडकून टीका केली आहे.
या प्रकाराला मुजोरी नाही तर काय म्हणायचे. कोर्ट हे सर्वोच्च स्थान आहे, त्याला तुम्ही जुमानत नाही. लालबागचा माणूस इकडे गाडी घेऊन फिरत आहे. गाडीच्या वर ट्रे बांधायला तुम्ही आरटीओची परमिशन घेतली आहे का? तुमचा अट्टाहास की दादरमध्येच येणार, कितीही लोकांना त्रास झाला तरी. याकडे पोलीस आरटीओ आणि महानगरपालिका सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी मनीषा कायंदे यांनी केली.
