[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राजा रघुवंशी प्रकरणाचा पर्दाफाश पत्नीने केली सुपारी देऊन पतीची हत्या


इंदौर : मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेले रघुवंशी दाम्पत्य बेपता झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पत्नी सोनम हिनेच पती राजा रघुवंशी याची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशातील तिघा जणांना सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात सोनमचा प्रियकर राज कुशवाहा देखील सामील असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज या हत्याकांडाचा मास्टरमाइंड आहे. त्यानेच सोनमसोबत मिळून मध्य प्रदेशातील तीन जणांना राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी दिली होती. या सर्वांनी मिळून मेघालयमध्ये हनिमून दरम्यान राजा रघुवंशीची हत्या केली. त्यानंतर सोनम तिचा प्रियकर राज कुशवाहा सोबत पळून गेली. सोनम आणि राज हे दोघे उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे पोहोचले, जिथे पोलिसांनी त्यांना पकडले.
राजा रघुवंशी आणि सोनम हे दोघे मध्य प्रदेशातील इंदूरचे रहिवासी होते. हनिमूनसाठी मेघालयला गेल्यानंतर ते दोघे 23 मे रोजी बेपत्ता झाले होते.
त्यानंतर 2 जून रोजी राजाचा मृतदेह चेरापूंजीजवळ सोहरारिम येथील एका दरीत सापडला.सोनम रघुवंशीला अटक केल्यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातून राज कुशवाहा, तसेच हल्लेखोर विक्की ठाकूर, आनंद आणि आकाश यांना सागर येथून अटक केली. मेघालयच्या डीजीपींनी एएनआयला माहिती देताना सांगितले की, “तिघा जणांना अटक करण्यात आली आहे, तर आत्मसमर्पण करणारी महिला राजा रघुवंशीची पत्नी सोनम आहे.”

error: Content is protected !!