[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर तब्बल एक वर्षा नंतर शेतकरी आंदोलन स्थगित शेतकऱ्यांनी सरकारला हरवले

दिल्ली/तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८० दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू होते ते अखेर काल स्थगित करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची माफी मागून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते मात्र शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या त्याही मागण्या मान्य करण्यावर शेतकरी अडून बसले होते अखेर या मागण्या बाबत नेमलेल्या पाच सदस्यीय समितीशी चर्चा करून उर्वरित मागण्या मान्य केल्या जातील असे लेखी आश्वासन सरकारने दिल्यानंतर काल आंदोलन स्थगित करण्यात आले

error: Content is protected !!