[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राहुल गांधींच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत महायुतीकडून टीकेची झोड

मुंबई/ राजकारणी लोकांना राजकारणासाठी शूल्लकसा विषय सुधा पुरेसा असतो.दिल्लीत राहुल गांधींनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसले होते.त्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे . उद्धव ठाकरेंना काँग्रेसने त्यांची जागा दाखवून दिली आहे असा हल्लाबोल महायुतीमध्ये नेत्यांनी केला आहे.तरमागे बसल्याची टीका करणारे लोक फालतू आहेत. समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन होत होते. उद्धवजींना पुढे बसवले होते. पण, त्यांचे म्हणणे पडले की स्क्रीनच्या समोर बसून पाहताना त्रास होतो किंवा नीट दिसत नाही. त्यामुळे आम्ही सर्वच पाठीमागे गेलो, असं संजय राऊतांनी सांगितले
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीत गेले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे हे देखील आहेत. या बैठकीत राहुल गांधी यांनी निवडणुकीत खोट्या मतदारांद्वारे कसे मतदान होत आहे त्याला भाजप आणि निवडणूक आयोगाची कशी साथ आहे, याचे प्रेझेंटेशन केले. मात्र, या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगत बसल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.बैठकीतील उद्धव ठाकरे यांचा फोटो दाखवत भाजप नेते केशव उपाध्ये यांनी आपणाची शेवटची रांग असे म्हणत डिवचले आहे.तर,भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मला नाही अब्रू, मी कशाला घाबरु…असे म्हणत ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.
केशव उपाध्ये म्हणाले आहेत की, ‘भाजपासोबत उध्दव ठाकरे होते, किती सन्मान होता मातोश्री व उध्दव ठाकरे यांना. देशातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते मातोश्री वर जाऊन सन्मान करीत. २०१९ लोकसभा निवडणूकीच्या वेळी अमित शाह मातोश्रीवर आले होते. आमहाविकास आघाडीत आल्यापासून राहूल गांधी, सोनिया गांधी कुणी मातोश्रीवर गेले? उत्तर नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आंदरांजली वाहण्यास कुणी काँग्रेस नेता गेला? उत्तर नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा काँग्रेसने हिंदुह्दयसम्राट असा उल्लेख केला? उत्तर नाही. आता उध्दव ठाकरेच दिल्लीत राहुल सोनिया गांधींना भेटायला जातात. हिंदुत्व सोडल, विचारधारा सोडली, त्यातून मान गेला सन्मान गेला, हातात पडलं काय, तर आता काय बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग.’, असा टोला देखील उपाध्ये यांनी ठाकरेंना लगावला.
ठाकरे यांना शेवटच्या रांगेत जागा दिल्याची टीका भाजप करत असताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे अगदीच हस्यास्पद आहे आणि बालीश आरोप आहे. इन्फाॅर्मल गेटटूगेदर होतं. कोणी कुठेही बसलं होतं. तो काय प्रोटोकाॅलचा कार्यक्रम नव्हता. अखिलेश यादव दुसऱ्या रांगेत बसले होते पवार साहेब दुसऱ्या का तिसऱ्या रांगते बसले होते. आम्हाला सह कुटुंबा एकत्र जेवणासाठी बोलावलं होतं. ज्या जिथे वाटलं तेथे तो बसला. तो सरकारी कार्यक्रम नव्हता. घरगुती कार्यक्रम होता.असे स्पष्टीकरण सुप्रियाने दिले.
दरम्यान काल राहुल गांधीनी मतांच्या चोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. मात्र त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधीवर टीका करत त्यांना प्रत्युत्तर दिलं. यावरूनच आता सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.निवडणूक आयोग स्वायत्त आहे, तर मग भाजप का पर्सनल घेत आहे ? राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केलेत, मग भाजप का उत्तर देतंय असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

error: Content is protected !!