ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

वेलकम २०२२

आजपासून २०२२ हे नवीन वर्ष सुरू झाले आहे .या वर्षात लोकांसमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ते त्या परमेश्वरालाच ठाऊक पण मागील दोन वर्षात माणसाच्या जे वाट्याला आले आहे त्याने माणूस खचला आहे. आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे अशावेळी निदान येणारे २०२२ हे वर्ष तरी सुखाचे जावो अशीच तो ईश्वराला प्रार्थना करतोय.शेवटी माणूस हा आशेवर जगणारा प्राणी आहे आशेला कर्तुत्वाची जोड देऊन देवाच्या कृपेची अभिलाषा बाळगणाऱ्या माणसाच्या पदरी गेल्या दोन वर्षात घोर निराशा पडली कारण कोरोणाने होत्याचे नव्हते केले एकट्या महाराष्ट्रात कोरोणाने दिड लाख माणसे मेली.त्यामुळे जगातल्या संपूर्ण मानव जतीनेच कोरोणचा धसका घेतलेला आहे तरीही माणूस जगण्याची धडपड करतोय २०२१ सलातले शेवटचे काही दिवस पुढील संकटांची चाहूल देऊन गेले कारण मावळत्या वर्षाच्या शेवटच्या एका आठवड्यात तब्बल ८ हजार नावे सापडले तर ओमिक्रोन चे ४५० रुग्ण सापडले ही आकडेवारी पाहिल्यानंतर भविष्यात आणखी कोणत्या संकटाचा मुकाबला करावा लागणार याच चिंतेत माणूस आहे मात्र त्याही स्थितीत माणसाने नेहमीप्रमाणेच हर्शोलासात नव वर्षाचे स्वागत केले आहे.या वर्षात आरोग्य विषयक संकटाच्या बरोबरच आर्थिक संकटाचा सुधा सामना करावा लागतोय कारण मागील दीड वर्षांपासून उद्योग धंदे बंद होते त्यामुळे सरकारच मोठ महसुली नुकसान झालंय.एकीकडे महसूल बुडतो तर दुसरीकडे कोरोणामुळे खर्च वाढतोय या दोन्हींचा ताळमेळ घळणे अशक्याले आहे म्हणूनच या वर्षात तरी संकट कररोणाचे दूर व्हायला हवे अन्यथा जगणे मुश्कील होईल होईल कारण या नव्या वर्षात माणसाने खूप काही संकल्प केले आहेत. कुणाला नवा उद्योग सुरू करायचा आहे कुणाला लग्नकार्य करायचं आहे तर कुणाला नवे घर घ्यायचे आहे.पण हे सगळ तेंव्हाच शक्य आहे. जेंव्हा सर्व काही सुरळीत सुरू असेल पण जर कोरोणचे हे संकट असेच राहिले तर मात्र केलेल्या संकल्पंवर पाणी फिरले जाईल आणि यावर्शिसुधा लोकांच्या पदरी निराशा पडेल.अर्थात कोरोना पासून मुक्ती मिळवायची असेल तर लोकांनीही जबाबदारीने वागायला हवे.सरकारने जे निर्बंध घातले आहेत ते पाळायला हवेत तरच या संकटातून मुक्ती मिळेल.
हेे निवडणुकांचे वर्ष आहे या वर्षात उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका आहेत शिवाय महाराष्ट्रात मुंबई ठाणे यासारख्या मोठ्या शहरांसह १८ महापालिकांच्या निवडणुका आहेत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अडवला आहे.अशावेळी पुढे काय होणार याकडे सर्व ओबीसी समाजाचे लक्ष लागलेले आहे.महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक निदान या वर्षात तरी येईल आणि इथल्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा होती पण कोरोनाने पुन्हा चिंता वाढवलेली आहे.खास करून जे छोटे उद्योग धंदे आहे त्यांची बिकट अवस्था आहे केंद्रातील भाजपा सरकार मदत करायला तयार आहे पण त्यांची मदत सावकारी मदत आहे .टी घेऊन तरी काय उपयोग कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने जी तीन मोठी मदत पॅकेजेस जनतेसाठी जाहीर केली टी मदत नव्हती तर मदतीच्या नावाखाली दिलेले कर्ज होते या वर्शिजर पुन्हा तर पुन्हा केंद्र सरकारं मदत जाहीर करील यावेळी कदाचित व्याज कमी असेल .पण संकटाच्या काळात जर अशा तऱ्हेने सरकार कडून लोकांची थट्टा होऊ लागली तर लोक गप्प बसणार नाहीत नव्या वर्षाचं लोकांनी स्वागत तर केले आहे पण या वर्षीही संकटाशी संघर्ष करावा लागणार हे मात्र नक्की!

error: Content is protected !!