मतांच्या चोरीच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना फटकारले
नवी दिल्ली/ बिहारची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच राहुल गांधी यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात मतांची चोरी झाली असा आरोप करून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.त्यामुळे निवडणूक आयोगाबाबत देशभर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा बिहारमधील मतदार यादी पूनसर्वेक्षणावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट पुरावेच सादर केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचाही आरोप केला. तसेच अनेक निवडणुकीत एका व्यक्तीने तीन वेळा मतदान केल्याचंही त्यांनी म्हटलं. राहुल गांधींच्या या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आलं आहे.
गांधी म्हणाले की, संविधानाची खरी ताकद म्हणजे मतदान आहे. पण निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धीनंतर योग्य व्यक्ती मतदान करते आहे का? अनेक मतदार यादीत बनावट मतदारांचा समावेश करण्यात आला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित होतो आहे.बोलताना राहुल गांधी म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतांची चोरी झाली आहे. आम्ही महाराष्ट्रात निवडणूक हरलो. तिथे ४० लाख मतदार अचानक वाढले. केवळ पाच महिन्यांत अनेक नवीन मतदारांचा समावेश मतदार यादीत करण्यात आला. निवडणूक आयोगाने या संदर्भात उत्तर द्यावं. तसेच या मतदार यादी खऱ्या आहे की खोट्या?, याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.बोलताना राहुल गांधी म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतांची चोरी झाली आहे. आम्ही महाराष्ट्रात निवडणूक हरलो. तिथे ४० लाख मतदार अचानक वाढले. केवळ पाच महिन्यांत अनेक नवीन मतदारांचा समावेश मतदार यादीत करण्यात आला. निवडणूक आयोगाने या संदर्भात उत्तर द्यावं. तसेच या मतदार यादी खऱ्या आहे की खोट्या?, याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.निवडणूक आयोग इलेक्ट्रॉनिक डेटाही देत नसल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. “आम्ही निवडणूक आयोगाकडे बऱ्याचदा डेटा मागितला पण त्यांनी आम्हाला डेटा दिला नाही. इतकंच काय तर आयोगाने आम्हाला उत्तरही दिलं नाही,” असंही राहुल गांधी यांनी सांगितलं. देशभरात बोगस पद्धतीने मतदान होतं असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला.
ही मतांची चोरी उघड करण्यास आम्हाला अनेक महिने गेले. मतदार यादीत अनेकांच्या वडिलांच्या नावासमोर काहीही लिहिलं नाही. अनेक घरांचे पत्त्यांचा उल्लेकही मतदार यादीत नाही. अनेक मतदार यादीत डुप्लिकेट मतदार आहेत. ११ हजार नागरिक असे आहेत, ज्यांनी तीन वेळा मतदान केलं आहे. हे लोक कोण आहेत? आणि कुठून आले? याशिवाय एका घराच्या पत्त्यावर ४६ मतदारांची नावं आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
राहुल गांधींच्या या गंभीर आरोपांवर सत्ताधारी पक्षांकडून टीका होत आहे.मतांची नव्हे तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिपची चोरी झाली असावी असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे
राहुल गांधींच्या आरोपामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वास हरतेला तडा गेल्याने आयोगाने त्यांना २४ तासात पुरावे द्या अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस दिली असल्याचे समजते.