[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच स्फोटकांचा साठा सापडला

चितोड/ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच संक्दरपूर गावात स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. गावाच्या परिसरात सुमारे २० किमीपर्यंत मोठ्या प्रमाणावर स्फोटके पेरण्यात आली आहेत. तसेच एका ट्रकमध्ये ५०० किलो स्फोटकांचा साठा सापडल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. पोलिसांची भूमिकाही संशयास्पद दिसत आहे.
येत्या १० जूनला आदित्यनाथ चित्तौराला येत आहेत, त्यापूर्वीच सकंदरपूर गावात ही घटना उघडकीस आली आहे. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असला तरी पोलीस अधिकाऱ्याने तेथून तो अमोनिअम नायट्रेट स्फोटकांनी भरलेला ट्रक दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला बराच वेळ पोलीस आले नाहीत, गावकऱ्यांनी या संशयास्पद गोष्टी आमदारांच्या कानावर घातल्या. त्यांनी जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीसांना देखील फोन करून याची माहिती दिली, तरीही तीन ते चार तास कोणी आले नाही. यामुळे शेवटी आमदारांनी लखनऊला फोन करून यंत्रणा हलविली तेव्हा हे अधिकारी पोहोचल्याचा आरोप आमदारांनी केला आहे.
तेल कंपनीच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली तीन वाहनांमधून सुमारे २०० लोक हरदी परिसरातील विविध गावांमध्ये पोहोचले होते. लांडग्याचा शोध घेण्यासाठी आल्याचे या लोकांनी गावकऱ्यांना सांगितले होते. परंतु, हे लोक जागोजागी सुरुंग पेरतात तशी स्फोटके पुरत होते. सुमारे २० किमी लांबवर या लोकांनी ही स्फोटके जमिनीत पुरली आहेत. साधुवापूर, लखनापूर, बालासराय, औरही आणि सिकंदरपूरसह २० किलोमीटरच्या परिघात ही स्फोटके पुरली आहेत. पोलीस अधिकारी स्फोटकांनी भरलेला कंटेनर जबरदस्तीने ग्रामीणांच्या तावडीतून सोडवत होता, असेही समोर आले आहे.प्रशासनाची सुत्रे हलल्यानंतर आता पोलिसांनी ७० लोकांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित शंभरहून अधिक लोक पळून गेले आहेत, त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकांची पेरणी करणे यामागे कारस्थान काय असा सवालही उपस्थित होत आहे. तेल कंपनीच्या सर्वेक्षणाची माहिती मिळत आहे, परंतू पोलिस प्रशासनाला काहीही कळविण्यात आले नव्हते असे आता पोलीस अधिकारी सांगत आहेत.

error: Content is protected !!