ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

चौथी पर्यंतच्या शाळा ९ नंतर भरणार – सरकारचा मोठा निर्णय


मुंबई – राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा त्यानंतर भरवण्याबाबत शासन निर्णय जारी नुकताच करण्यात आलाय. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान मा. राज्यपाल यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आलाय.
हा खरोखरच शाळांबाबत घेण्यात आलेला मोठा निर्णय नक्कीच म्हणावा लागेल. आता याबद्दल शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी ९ वाजताच्या अगोदरची आहे. त्यांना आता वेळेमध्ये बदल हे करावे लागणार आहेत.
त्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी ९ किंवा ९ नंतर ठेवावी. असे अध्यादेशात थेट सांगण्यात आले. शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही, याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावा
थोडक्यात काय तर आता राज्यातील सर्वच केजी ते इयत्ता चौथीच्या शाळांच्या वेळेमध्ये मोठे बदल हे करण्यात आले आहेत. राज्यात अनेक शाळांच्या वेळ या सकाळी सात वगैर आहेत. मात्र, आता शासनाच्या या निर्णयामुळे शाळा प्रशासनांना शाळेच्या वेळेमध्ये मोठे बदल हे करावे लागणार आहेत.
केजी ते इयत्ता चौथीच्या मुलांच्या शाळा या सकाळच्या वेळेत जास्त प्रमाणात आहेत. आता या शाळा सकाळी ९ किंवा त्यानंतर नंतर घ्याव्या लागणार आहेत. बाकी चाैथीनंतरच्या वर्गाचे जे वेळ अगोदरप्रमाणे आहेत, त्याचप्रमाणे राहणार आहेत. फक्त हा निर्णय केजी ते केजी ते इयत्ता चौथीच्या वर्गांसाठी शासनाकडून घेण्यात आलाय.

error: Content is protected !!