ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

चुकीचा पायंडा

मोदींनी जे आरोप केले आहेत त्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत कारण कोविड काळात महाराष्ट्र सरकारने परप्रांतियांना किती मदत केली हे तेच लोक सांगू शकतात.युपी बिहारच्या कित्येक लोकांनी महाराष्ट्र सरकारने केलेल्या मदतीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांचे जाहीर आभार मानले आहेत त्याबाबतचे व्हिडिओ एकदा मोदींनी पहावेत आणि नंतर आरोप करावेत मोदींनी काँग्रेसवर जे आरोप केलेत ते त्यांनी संसदेत न करता बाहेर करायला हवे होते .कारण आजवर कुठल्याही पंतप्रधानाने इतक्या खलच्या पातळीवरून विरोधकांवर आरोप केले नव्हते राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात पण ते बाहेर व्हायला हवेत संसदेत आरोप प्रत्यारोप करणे म्हणजे लोकशाहीच्या या पवित्र मदिराचा अवमान करण्यासारखे आहे.काँग्रेस मुले शीख समुदायाचे हत्याकांड झाले अशा पद्धतीचे आरोप बाहेर ठीक आहेत पण संसदेत व्हायला नकोत कारण ही एक प्रकारे चिथावणी ठरू शकते आणि पंत प्रधान पदावर बसलेल्या माणसाने अशा प्रकारचे चिथावणीखोर आरोप करून समाजातील वातावरण गढूळ करणे चुकीचे आहे
पंतप्रधान हा कुठल्या एका पक्षाचा नसतो त्यामुळे त्याने अत्यंत जबाबदारीने बोलायचे असते निवडणूक परचारत टीका टिप्पणी ठीक आहे पण संसद हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे तिथे पंत प्रधान मोदी यांनी विरोधी पक्षावर पटली सोडून जितका केली तो पंत प्रधान पडला शोभणारी नव्हती .राष्ट्रपतींच्या अभिभासणावरील चर्चेवर बोलताना पंत प्रधान मोदी यांनी केलेले भाषण हे संसदीय परंरेचा अवमान करणारे आणि चुकीचा पायंडा पडणारे होते कारण संसद ही लोकशाही मूल्यांची जतन करणारे आणि जनतेच्या तसेच राष्ट्राच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लोकशाहीने उपलब्ध करून दिलेले एक मोठे व्यासपीठ आहे आणि देशाच्या विविध भागातून जनतेने निवडून दिलेले लोक प्रतिनिधी इथे येतात आणि लोक सभेचे ५४३ आणि राज्यसभेचे २४५ सदस्य मिळून संविधानाने आखून दिलेल्या चौकटीत राहून हा देश चालवतात यातील काही सत्ताधारी असतात तर काही विरोधक अशावेळी दोघांचीही देशाच्या प्रति सारखीच जबाबदारी असते .असे असताना पंत प्रधान पदासारख्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीने संविधानाच्या मर्यादेत आणि संसदीय नियमांच्या चौकटीत राहून बोलायचे असते पण भाजपचे लोक बाहेर जी भाषा वापरतात त्याच भाषेत पंत प्रधान जर संसदेत बोलायला लागले तर त्यांच्यात आणि वाचाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपच्या अन्य सदस्यांमध्ये फरक तो काय? पंत प्रधान मोदी यांनी लोकसभेतील आपल्या भाषणात काँग्रेसवर बेछूट आरोप केले आहेत. ते म्हणतात की कोरोनोचा संकट काळात महाराष्ट्रात काँग्रेसने परप्रांतीयांवर अन्याय केला त्यांना म्हणे गावची तिकिटे कडून जबरदस्तीने त्यांच्या गावी पाठवले पंत प्रधान मोदींचा हा आरोप बिनबुडाचा आणि महाराष्ट्राचा अपमान करणारा आहे महाराष्ट्राने कधीही परप्रांतीय लोकांवर अन्याय केला नाही कोरोनाच्य संकट काळात ज्यांचा काम धंदा गेला त्यांना अन्न धान्य दिले तर जे लोक स्वतःच्या मर्जीने आणि कोरोनच्या भीतीने आपल्या गावी निघाले होते अशा ट्रेन उपलब्ध करून दिल्या मात्र कोणालाही जबरदस्तीने मुंबईबाहेर काढले नाही त्याच बरोबर काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या लोकांनीही अनेक ठिकाणी अन्न धान्य वाटप करून लोकांना मदत केली असे असताना पंत प्रधान संसदेत महाराष्ट्राची आणि काँग्रेसची बदनामी करीत अस्तीलतर ते दुर्दैव म्हणावे लागेल अर्थात दिल्लीत कोणाचेही सरकार असून महाराष्ट्राच्या बाबतीत दिल्लीतले सत्ताधारी नेहमीच आकसाने वागतात. मुंबईतून देशाला ४० टक्के महसूल मिळतो त्या बदल्यात मोदींच्या केंद्र सरकारने गेल्या सात मुंबईला काय दिले ते अगोदर सांगावे आणि नंतर महाराष्ट्रावर आरोप करावेत लॉक डाऊन च्या काळात मोदी सरकारने जी तीन मदत पॅकेज जाहीर केली होती ती मदत नव्हती तर ते कर्ज होते म्हणजे संकट काळात मदत करण्याऐवजी लोकांना कर्ज द्यायचे आणि वरून कोविड आम्ही किती केले हे दाखवण्याचा खटाटोप करायचा हे कुठे तरी थांबायला हवे.

error: Content is protected !!