ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आमदार पात्र – अपात्रतेचं निकाल बुधवारी


मुंबई – शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही पक्षाच्या प्रतोदांनी एकमेकांच्या विरोधात व्हीप काढले होते त्यानुसार पक्षाच्या बैठकीला अपात्र असलेल्या शिंदे गटाच्या ४१ फुटीर आमदार व ठाकरे गटाच्या १६ आमदारांच्या पात्र अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर झाली होती त्याचा निकाल १० जानेवारी म्हणजेच येत्या बुधवारी असून त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
सर्वोच्च न्यायायलाच्या निर्देशांनुसार शिवसेना आमदार अपात्रप्रकरणी नार्वेकर यांनी १० जानेवारीपर्यंत निर्णय देणे अपेक्षित आहे. मात्र या निकालापूर्वीच नार्वेकर हे आजारी पडल्याने त्यावरून विरोधकांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा अध्यक्षांचे आजारी पडणे हा संभाव्य राजकीय भूकंपाचा भाग असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. या पार्श्वभूमीवर नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या जात आहेत.नार्वेकर हे आजारी असूनही रविवारी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची भेट ठरलेली नव्हती. परंतु अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी वर्षा बंगल्यावर केवळ मुख्यमंत्री आणि नार्वेकर हे दोघेच उपस्थित होते. अन्य कोणीही नेता यावेळी उपस्थित नव्हता. दोन्ही उपमुख्यमंत्रीही या बैठकीत नव्हते. त्यामुळे या भेटीची चर्चा राजकीय़ वर्तुळात रंगली होती.

error: Content is protected !!