[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

७२ तास कुठे निजल्या होत्या? महापौरांची थेट गृह मंत्र्यांकडे फिर्याद-आशीष शेलार अडचणीत

मुंबई/ राजकारणातील व्यक्तींनी किती जरी मतभेद असेल तरी महिलांविषयी अत्यंत जबाबदारीने बोलायचे असते पण सुसंस्कृत पना आणि शिस्तीचा ढोल वाजवणार भाजपच्या नेत्यांना आता याच गोष्टीचा विसर पडत चालला असून भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी चक्क मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणात ७२ तास कुठे निजला होता असा संतापजनक सवाल मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महिला महापौरांना विचारला होता .त्यानंतर त्यांनी माफीही मागितली नाही त्यामुळे महापौरांनी याबाबतची लेखी तक्रार राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
वरळी सिलेंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांना प्राण गमवावे लागले होते मात्र इतर कामात व्यस्त असलेल्या महापौर तेथे उशिरा पोचल्या आणि त्याचेच कारण पुढे करून आशीष शेलार यांनी महापौरांना उद्देशून अत्यंत संतापजनक विधान केले होते. त्यांच्या त्या विधानाने मुंबईत संतापाची लाट उसळली होती मात्र शेलार यांनी माफी मागितली नाही .त्यामुळे महापौरांनी आज गृह मंत्र्यांकडे लेखी तक्रार करून शेलार यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी केलीय तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकण कर यांनीही गृह मंत्र्यांकडे लेखी तक्रार केलीय त्यामुळे शेलार चांगलेच अडचणीत आलेत.

error: Content is protected !!