ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पॅनकार्ड शिवाय खाती उघडली; प्राप्तिकर विभागाने ‘या’ सहकारी बँंकेचे ५३ कोटी गोठवले

नवी दिल्ली : पॅनकार्डशिवाय नवीन बँक खाती सुरु केल्याचा ठपका ठेवत प्राप्तिकर विभागाने राज्यातील एका आघाडीच्या नागरी सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. ज्यात बँकेच्या ५३ कोटींच्या ठेवी गोठवल्या आहेत. ही बँक बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट बँक असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.

नागरी सहकारी बॅंकांमध्ये आघाडीवर असलेल्या बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट बँकेवर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली आहे. बँकेने पॅनकार्डशिवाय शेकडो बँक खाती सुरु केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पॅनकार्डशिवाय नवीन बँक खाती सुरु केल्याचा ठपका
प्राप्तिकर विभागाने एका आघाडीच्या सहकारी बँंकेचे ५३ कोटी गोठवले .बँकेचा डेटा आणि सीबीएस प्रणालीची प्राप्तिकर विभागाने तपासणी केल
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने शनिवारी या कारवाईची माहिती दिली. बँकेचा डेटा आणि सीबीएस प्रणालीची तपासणी केली असता बँक खाती सुरु करण्यात प्रचंड अनियमितता प्राप्तिकर विभागाला आढळून आली आहे. जवळपास १२०० नवीन खाती ही पॅनकार्ड नसताना देखील सुरु करण्याचे आल्याचे तपासात निष्पन्न झाले. याशिवाय ही खाती सुरु करताना नियमांचे उल्लंघन केले आहे. केवायसी देखील योग्य प्रकारे केलेलं नाही असे प्राप्तिकर विभागाने म्हटलं आहे.

error: Content is protected !!