बाबा सिद्दिकी हत्तेतील फरार आरोपीला कॅनडात अटक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणातील फरार असलेल्या आरोपी झिशान अख्तर संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी झिशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवाल याला कॅनडातील सरे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातला फरार असलेला मुख्य आरोपी झिशान अख्तर कॅनडात सापडल्याची माहिती. सूत्रांच्या माहितीनुसार झिशान अख्तरला कॅनडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बनावट पासपोर्टच्या आधारे झिशान कॅनडात पोहोचला होता अशी सूत्रांची माहिती आहे.
मुंबई पोलीस झिशान अख्तरला ताब्यात घेण्याची माहिती वरिष्ठ पातळीवर घेत आहेत.बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात फरार असलेल्या महत्वाच्या आरोपींपैकी एक आरोपी म्हणून पोलीस झिशान अख्तरचा शोध घेत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या 12 ऑक्टोबर २०२४ला करण्यात आली होती. झिशान सिद्दिकी याच्या कार्यालयाबाहेर रात्रीच्या वेळी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. अभिनेता सलमान खानचे निकटवर्तीय असल्यानं त्यांच्यावर गोळीबार केल्याचा दावा बिश्नोई टोळीकडून करण्यात आला होता. बाबासिद्दिकी हत्या प्रकरणातील फरार असलेला झिशान अख्तर हा जालंधरच रहिवासी आहे. बाबा सिद्दिकींवर गोळीबार झाला तेव्हा तो घटनास्थळी होता. त्यानंतर तो भारत सोडून पळून गेल्याचं समोर आलं आहे. यासाठी झिशान अख्तरनं पाकिस्तानातील अंडरवल्डमधील शहझाद भट्टीची मदत घेतल्याची माहिती आहे. शहझाद भट्टी हा फारुक खोखर गँगचा सदस्य आहे.
झीशान अख्तरनं एक व्हिडिओ जारी केला होता. त्यामध्ये त्यानं बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आणि भारतातील इतर गुन्हेगारी घटनांमध्ये सहभागी असल्याचं म्हटलं होतं.
