[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आमदार पात्र – अपात्र निकालाची कागदपत्र सादर करा – सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना आदेश


नवी दिल्ली – शिवेसना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टानं १ एप्रिलपर्यंत यासंबंधीची कागदपत्रे सुप्रीम कोर्टात सादर करण्याचा आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.त्यामुळं शिंदे गटासाठी हा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर ८ एप्रिल रोजी याची पुढील सुनावणी होणार आहे
आजच्या एकनाथ शिंदे गटाकडून वरिष्ठ वकील मुकुल रोहोतगी, हरीश साळवे, महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली तर उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. यावेळी सुप्रीम कोर्टानं सुभाष देसाई खटल्यात सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला होता. त्यातील पराग्राफ १४४ चा उल्लेख दोन वेळा केला. यामध्ये, सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना सुचवलं होतं की, जरी निवडणूक आयोगानं पक्षाबाबत काहीही निकाल दिलेला असला तरी तुम्ही अगदीच तसाच निकाल दिला पाहिजे असं नाही तर कागदपत्रे तपासून तुमच्या सद्सदविवेकबुद्धीनं निकाल द्यावा
दरम्यान, या सुनावणीचं विश्लेषण करताना सुप्रीम कोर्टाचे वकील अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं की, “आज ठरवलं जाणार होतं की हे प्रकरण हायकोर्टात चालणार की सुप्रीम कोर्टात चालणार?. याबाबत हरिश साळवे यांनी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही आधी हायकोर्टात गेलो होतो त्यामुळं ही केस हायकोर्टातच चालावी. पण १९९२ मधील घटनापीठाच्या निकालानुसार, अध्यक्षांच्या निर्णायविरोधात तुम्ही हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात कुठेही जाऊ शकतात. पण एकनाथ शिंदे हे हायकोर्टात गेले होते

error: Content is protected !!